Vat Purnima : वटपौर्णिमेनिमित्त डिचोली बाजार फुलला; साहित्याचे दर वाढले तरी खरेदीची लगबग

सुवासिनींकडून तयारी जोरात : साहित्याचे दर वाढले तरी खरेदीची लगबग; अननसांना मागणी
Goods Purchasing for Vatpournima
Goods Purchasing for VatpournimaGomantak Digital Team

डिचोली : प्रतिव्रतेचे महात्म्य वर्णन करणारे आणि सुवासिनींच्या उत्साहाला उधाण देणारे व्रत म्हणजेच वटपौर्णिमा. येत्या शनिवारी (ता.3) वटपौर्णिमा साजरी होत असल्याने सध्या डिचोलीत सर्वत्र या व्रताच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. वटपौर्णिमेला लागणारे साहित्यही बाजारात दाखल झाले असून, या साहित्याने बाजार फुलू लागला आहे.

बाजारात वटपौर्णिमेच्या साहित्याची खरेदी सुरू झाली असून, उद्या खरेदीला जोर येणार आहे. तसे संकेतही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. बाजारात यंदा अननसांची आवक कमी असून, अननसांसह अन्य साहित्यही काहीसे महाग झाले आहे. तरीदेखील महिला हे साहित्य उत्साहाने खरेदी करत आहेत.

Goods Purchasing for Vatpournima
Bicholim News: वाठादेव भागातील बागायतदारांसमोर 'नवं संकट'; चक्क दगडी कुंपण मोडत...

बुधवारी साप्ताहिक बाजाराच्या दिवसापासून डिचोलीचा बाजार वटपौर्णिमेच्या साहित्याने फुलू लागला आहे. अननस, आंबे, फणस, केळी आदी फळांसह वडाच्या फांद्या, वडाची पाने, अणशीचे दोर आदी साहित्य डिचोली बाजारात दाखल झाले आहे. उद्या मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागातून शहरी बाजारपेठांमध्ये वटपौर्णिमेचे साहित्य घेऊन मोठ्या प्रमाणात महिला दाखल झाल्या आहेत.

Goods Purchasing for Vatpournima
Bicholim News : म्हादई अभयारण्यात ‘व्याघ्र प्रकल्प’ हवाच

फणस, अननस बाजारात दाखल

गुरुवारी (ता.1) रसाळ फणस 100 ते 150 रुपये नग तर कापा फणस आकाराप्रमाणे 200 ते 350 रुपये नग या दराने विकले जात होते. तोतापुरी आणि अन्य जातीचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी स्वस्त झालेले मानकुराद आंबे 500 ते 600 रुपये डझन याप्रमाणे विकण्यात येत आहेत. वडाची फांदी 20 रुपयांना एक तर वडाची पानेही बाजारात दाखल झाली आहेत. आकाराप्रमाणे 50 ते 100 रुपये एक नग असे अननसांचे दर आहेत.

Goods Purchasing for Vatpournima
Bicholim News : डिचोलीत वेदांताच्या खाणीवर बाहेरील कामगारांना रोखले

वटपौर्णिमा हे सुवासिनींसाठी आनंददायी आणि उत्साह द्विगुणित करणारे व्रत. हे व्रत पाळून सुवासिनी आपल्या पतीसाठी आयुष्य मागतात. दोन दिवस आधीच या व्रताची तयारी सुरू असते. बदलत्या युगातही वटपौर्णिमेचे महत्त्व कमी झालेले नाही. हे या व्रताचे वैशिष्ट्य.

- अर्चना लामगावकर, डिचोली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com