Goa Vegetabales Rate: गोव्यात रब्बी हंगामाला सुरुवात; स्थानिक भाज्यांना ग्राहकांची अधिक पसंती

Goa Vegetabales Rate: गोवा बाजारात स्थानिक भाजीपाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून टोमॅटोचा दर घसरला आहे.
Vegetabales
Vegetabales Dainik Gomantak

Goa Vegetabales Rate: गोवा राज्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून राज्यातील ग्रामीण भागात पिके देखील येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पालेभाज्या तसेच फळभाज्यांना राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असून अनेक नागरिक स्थानिक भाज्यांना पसंती देत त्या खरेदी करत आहेत.

स्थानिक भाजी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून टोमॅटोचा दर घसरला आहे. बेळगाव बाजारात टोमॅटो दर 50 ते 60 रुपये दहा किलो असा आहे. त्यामुळे गोव्यातही काही प्रमाणात टोमॅटोचा दर घसरला आहे. फलोत्पादन मंडळाकडे किलोचा दर - टोमॅटो 14 रुपये आहे. कांदा 28 रु, बटाचा 26 रू., कोबी 12 रुपये, भेंडी 41 रु. अशा दर आहे. काल पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होता.

स्थानिक भाज्यांसह अळू माडी, रताळी, भाजीची केळी, आदी भाज्यादेखील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते. राज्यात अळू माडीला मोठ्या प्रमाणात मागणी असून मध्यम आकाराची ही माडी 80 ते 100 रुपये प्रति नग दराने विकली जात आहे, तर मोठी माडी 150 ते 200 रुपये दराने नागरिक विकत घेताना दिसतात. पणजी बाजारात या माडीला मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिक आवर्जून खरेदी करताना दिसतात.

Vegetabales
Goa Government: 'खाजन' सांतआंद्रेतीलच नव्हे, तर राज्यातील एक प्रमुख विषय असल्याने जमीन पुनरुज्जीवित करणार

गोवा राज्यात कांदे, बटाटे तसेच इतर भाजीपालादेखील अजून महागच आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. टोमॅटो 30 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. हिरवी मिरचीचे दर उतरले असून 80 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. मागील काही महिन्यात मिरचीने शंभरी गाठली होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही हिरव्या मिरचीचे भाव दुप्पटच आहेत.

दर प्रतिकिलो (रुपयांत)

कांदा 25-40, बटाटा 35, टोमॅटो 25, गवार 60, कोबी 40 फ्लॉवर 40, गाजर 60-80, भेंडी 70-80, मिरची 80, हिरवी मिरची 100

पालेभाजी प्रतिजुडी (रुपयांत)

मेथी 20, लालभाजी 20, कांदापात २०, मुळा 20, पालक 20, शेपू 10, पुदिना 10, कोथिंबीर 30 रु. एक जुडी, लिंबू -3 रुपयांना 1.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com