पणजीत भाज्यांच्या दरात चढउतार सुरूच

मानकुरादची आवक घटली; टोमॅटो 80 रु
पणजीत भाज्यांच्या दरात चढउतार सुरूच
Vegetables rate in PanajiDainik Gomantak

पणजी : गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात चढउतार सुरूच आहे. दोन आठवड्यापूर्वी पणजी बाजारात टोमॅटोने शंभरी पार केली होती. मात्र, आता टोमॅटोचे दर 20 रुपयांनी घसरले असून ते 80 वर आलेले आहेत, तर फलोत्पादनच्या गाळ्यांवर 56 रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत.

Vegetables rate in Panaji
वास्कोतील दुकानात चोरी; 20 हजारांची रोकड केली लंपास

गोमंतकीयांच्या आवडत्या मानकुराद आंब्याची आवक घटल्याने त्याची 500 ते 600 रुपये प्रति डझन दराने विक्री सुरू आहे. मेथीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असून 30 रुपये जुडी दराने विकली जात आहे. कांदे, बटाट्याचे दर स्थिर आहेत. कोथंबिरीच्या दरातही 10 रुपयांनी वाढ झाली आहे. मध्यंतरी दहा रुपयांना एक मिळणाऱ्या लिंबूचे दर घटले असून गुरुवारी पणजी बाजारात 20 रुपयांना चार विकले जात होते. राज्यात मासेमारी बंदी लागू झाल्याने भाज्यांची मागणी वाढणार आहे. पावसाळ्यात भाजी नासाडीची शक्यता असते. त्यामुळे भाजी दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com