Velsao: 'रेल्वे डबल ट्रॅकिंग'वरुन वेळसाव ग्रामसभेत खडाजंगी

डबल ट्रॅकिंग, मायनिंग प्रश्न नागरिकांनी धरले लावून
Gramsbha
GramsbhaDainik Gomantak

वेळसाव ग्रामसभा आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी पार पडली असून यावेळी खाण काम, रेल्वे मार्ग डबल ट्रॅकिंग, नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या या मुद्यावरुन चर्चा झाली. यावेळी ग्रामस्थांनी परिसरात समस्या वाढल्याच्या कारणावरुन पंचांना फैलावर घेतले.

(Velsao Panchayat Gram Sabha heats up over double tracking)

Gramsbha
Chorla Ghat Blocked: चोर्ला घाटातील वाहतूक ठप्प; अवजड ट्रकमुळे कोंडी

याबाबत नागरिकांनी माहिती दिली की, वेळसाव परिसरात आता मायनिंग सुरु होणार असल्याची स्थिती आहे. मात्र मायनिंग सुरु होण्यापुर्वी याबाबत नागरिकांचे काही प्रश्न आहेत. ज्या मध्ये सर्व नागरिकांचे हीत आहे. हे प्रश्न सुटणार असतील तर वेळसाव नागरिक मायनिंगसाठी सकारात्मकता दाखवतील.

कारण पुर्वानूभव असा आहे की, मायनिंग सुरु झाले की, स्थानिकांच्या प्रश्नाकडे पहाण्यास कोणालाच वेळ असत नाही. त्यामुळे ते सुरु होण्यापूर्वी वेळसाव पंचांनी ते सो़डवणे आवश्यक असल्याचं मत मांडलं आहे.

Gramsbha
National Unity Day Run: गोव्यात रन फॉर युनिटीला उदंड प्रतिसाद

तसेच वेळसाव ग्रामस्थांनी रेल्वे विकास निगम लिमिटेडद्वारे अनेक वेळा लिमिटेड रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचा प्रयत्न हाणून पाडला आहे. हाच मुद्दा ग्रामस्थांनी ग्रामसभेत उचलून धरला. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पंचाना सुचित केले आहे.

नेमकं काय आहे डबल ट्रॅकिंगवरून प्रकरण

वेळसाव येथे रेल्वे विकास निगम लिमिटेड रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठी येथील ग्रामस्थांची खाजगी जमीन बळकावण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत. असा आरोप वेळसाव ग्रामस्थांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर रेल्वे विकास निगम लिमिटेडचे कर्मचारी रेल्वे ट्रॅक जवळ कुंपण घालण्यासाठी अनेकदा येत सर्वे करण्यासाठी प्रयत्नात होते. मात्र वेळसाव ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत हे काम बंद पाडले आहे. असे प्रकार वारंवार होत असुन यावर काय तो तोडगा काढणे आवश्यक असल्याचं मत नागरिकांनी या ग्रामसभेत मांडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com