फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांचा राजीनामा

Dainik gomantak
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज (मंगळवारी) पालिका संचालकांना सादर केला. वर्षभरापूर्वी व्यंकटेश नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पालिका बैठकीनंतर हा राजीनामा देण्यात आला आहे.

फोंडा

फोंडा पालिकेची निवडणूक झाल्यानंतर सुरवातीला मगो पक्षाने आपले प्राबल्य दाखवत प्रदीप नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड केली होती. पण, नंतरच्या काळात प्रदीप नाईक यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे समर्थक व्यंकटेश नाईक यांची निवड नगराध्यक्षपदी झाली होती. वर्षभराच्या कार्यकाळानंतर आता व्यंकटेश नाईक यांनी आपला राजीनामा सादर केला असून आपल्याला कोणत्याच प्रकारचा वाद नको असल्याने आपण हा राजीनामा दिला असल्याचे सांगून आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत पालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना लावण्यात यशस्वी ठरलो असल्याचे त्यांनी नमूद केले. 
फोंडा पालिकेत सुरवातीला मगो, भाजप व कॉंग्रेस अशा तिन्ही राजकीय पक्षांचे समर्थक निवडून आले होते. आता कॉंग्रेसचे समर्थक तिन्ही नगरसेवक भाजपमध्ये सामील झाल्याने नगराध्यक्षपदी रितेश नाईक यांची वर्णी लागते की, अन्य कुणाची अथवा व्यंकटेश नाईक यांना पुन्हा संधी मिळते याबाबत चर्चा होत आहे.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या