Goa BJP: भाजपच्या कार्यकर्ता बैठकीत शाब्दिक बाचाबाची

दोषपूर्ण मतदानाचा आरोप; आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

काणकोण: काणकोणात भाजपच्या उमेदवारीवरून पक्षाच्या मंडळात होऊ घातलेली फूट शमविण्यासाठी भाजपने काल भाजपचे मंडळ व प्रमुख कार्यकर्ते यांची खास बैठक राजबाग - तारीर येथील पेंटाकॉन येथे घेतली. मडगाव भाजप (Goa BJP) कार्यालयात उमेदवारीसाठी करण्यात आलेले दोषपूर्ण मतदान यामुळे भाजप मंडळाचे काही पदाधिकारी आधीच नाखूष आहेत. त्यामुळे या बैठकीनंतर काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची व आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. (Verbal argument in meeting of goa BJP workers)

Goa BJP
सोयींपेक्षा गैरसोयीच जास्त असलेल्या फोंड्याला फक्त आश्‍वासनेच मिळाली..

या बैठकीला पक्षाचे कर्नाटकातील नेते सुनील हेगडे व महाराष्ट्रातील महेश कोटक, रघुनाथ कुलकर्णी, भाजप मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, राज्य सचिव सर्वानंद भगत उपस्थित होते. आम्ही उमेदवारी देण्यासाठी आलो नाही, बुथ सक्रिय करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहोत, असे स्पष्टीकरण यावेळी उपस्थित काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी दोन गटांतील धुसफुस शमविण्यासाठी केले. त्यांनी बुथ कार्यप्रवण करण्यासंबंधी बुथ प्रमुख, शक्ती केंद्रे यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला लोलयेचे सरपंच सचिन नाईक, पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर, खोतीगावचे सरपंच दया गावकर, गावडोंगरी पंचायतीचे सरपंच अंजली वेळीप व विविध पंचायतीचे आजी माजी पंच उपस्थित होते. गुरुवारी या नेत्यांनी लोलये पंचायत मंडळाची भेट घेऊन त्यांची मते आजमावून पाहिली. मात्र, नऊपैकी आठ पंचांनी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या बाजूने कौल दिला, असे सरपंच सचिन नाईक यांनी सांगितले.

Goa BJP
Goa Congress: माझ्यावर केलेला तो आरोप बिनबुडाचा: आलेक्स सिक्वेरा

काणकोणची समीकरणे बदलणार

काणकोणची (Canacona) राजकीय समीकरणे बदलाच्या वळणावर पोचली आहेत. त्याचप्रमाणे 2017 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. उमेदवार तेच मात्र त्यांची जागा बदलणार आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी माजी आमदार विजय पै खोत यांना दिल्याने माजी मंत्री रमेश तवडकर यांनी भाजप मंडळात उभी फूट पाडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी उपसभापती इजिदोर फर्नांडिस काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. आता भाजपची उमेदवारी तवडकर यांना देऊन भाजप पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, आताही भाजप मंडळात फूट अटळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com