चर्चिल, रेजिनाल्ड यांच्यात वाक् युद्धाच्या ठिणग्या

fight
fight

मडगाव

सासष्टीत कोरोनाने डोके वर काढलेले असतानाच बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लाॅरेन्स यांच्यात संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत.
कुडतरीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपाययोजनांत आमदार रेजिनाल्ड लाॅरेन्स प्रत्यक्ष मैदानात उतरून नेतृत्व करत आहेत. त्यात आलेमाव यांनी मंगळवारी कुडतरीत भेट देऊन कुडतरीवासीयांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. पण, रेजिनाल्ड यांना मात्र आलेमाव यांची कुडतरीतील भेट रुचली नाही. रेजिनाल्ड यांनी आज आलेमाव प्रतिनिधीत्व करत असलेल्या बाणावलीत भेट देऊन ‘हम भी कुछ कम नही’ असा संदेश दिला. बाणावली येथे गोवा सीमेन संघटनेचे पदाधिकारी डिक्सन वाझ यांनी आयोजित केलेल्या छोटेखानी सांजाव कार्यक्रमात रेजिनाल्ड सहभागी झाले. आलेमाव यांनी कुडतरीत लक्ष देऊ नये. त्यांनी बाणावलीतच आपले लक्ष केंद्रीत करावे व २०१२ च्या निवडणुकीत आलेमाव कुटुंबातील ४ जणांचा पराभव का झाला? त्याचा अभ्यास करावा, असा टोला हाणला.
आलेमाव व रेजिनाल्ड यांच्यात तेरा वर्षांपूर्वी सौहार्दाचे संबंध होते. आलेमाव यांनी २००७ मध्ये स्थापन केलेल्या सेव्ह गोवा फ्रंट पक्षात रेजिनाल्डही होते. २००७ च्या निवडणुकीत गोवा फ्रंटच्या उमेदवारीवरच त्यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोवा फ्रंटचे आलेमाव व रेजिनाल्ड हे दोन आमदार निवडून आले होते. पुढे आलेमाव यांनी सेव्ह गोवा फ्रंट काॅंग्रेसमध्ये विलीन केला आणि या दोघांनीही काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. पण, त्यानंतर या दोघांमध्ये बिनसले. अधूनमधून त्यांच्यात संघर्षाच्या ठिणग्या उडत असतात.
या खेपेस जिल्हा पंचायत निवडणूक रद्द झाली. या निवडणुकीतही या दोघांमधील वैर उफाळले होते. काॅंग्रेसच्या बाणावलीतील उमेदवार राॅयला फर्नांडिस यांच्या प्रचारासाठी रेजिनाल्ड यांनी बाणावलीत उपस्थिती लावली. रेजिनाल्ड यांची ही कृती आलेमाव यांच्या पसंतीस पडली नाही. त्यांनी कुडतरीत आपला उमेदवार उभा करून रेजिनाल्ड यांना इशारा देण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा या दोघां नेत्यांमधील वैर उफाळून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com