Goa Highway Green Corridor: वेर्णा महामार्ग लवकरच बनवणार ग्रीन कॉरिडॉर

हिरवेगार आवरण : दोन्ही बाजूला असतील झाडे, ओढे आणि दोन मोठे तलाव
Verna
VernaGomantak Digital Team

धीरज हरमलकर 

Goa Highway Green Corridor: वेर्णा पठारावर लवकरच हिरवेगार आवरण येणार आहे. जीएसएआय इतर भागधारकांसह एक पथदर्शी प्रकल्प बनवणार आहे, ज्यात वेर्णा महामार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे, ओढे असलेले दोन मोठे तलाव समाविष्ट असतील.

गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी याबाबत ‘गोमन्‍तक’ला सांगितले की, स्ट्रॉम वॉटर ड्रेनमधील पावसाचे पाणी गोळा करून ते बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी वापरले जाते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी आम्ही खड्डे खणतो आणि या ठिकाणाहून बोअरवेल रिचार्ज केल्या जातात.

रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या योजनेबद्दल अधिक माहिती देताना त्‍यांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील 7.5 टक्के मोकळ्या जागेत एक नवीन पथदर्शी प्रकल्प आणण्याची योजना आखत असल्याचे सांगितले. 7.5 टक्के मोकळ्या जागेचा वापर स्थानिक लोक कचरा टाकण्यासाठी करतात. परंतु ही जागा अधिक चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी आम्ही तिचे ग्रीन कॉरिडॉरमध्ये रूपांतर करण्याचा विचार करत आहोत.

आम्हाला पावसाचे पाणी साठवण्यासाठी वेर्णा महामार्गाच्या दोन्ही बाजूला दोन मोठे तलाव बनवायचे आहेत, झाडे लावायची आहेत. जिथे पायी चालण्याचा मार्ग आणि एक मनोरंजन क्षेत्र विकसित केले जाऊ शकते, असे कोचकर म्‍हणाले.

Verna
Panaji Session Court : भंडारी समाज जमीन हस्तांतर घोळ; चोवीस तासांत तक्रार दाखल करा!

तलावांमध्‍ये पक्षी, प्राण्‍यांचा असेल अधिवास

या प्रकल्पात दोन मोठे तलाव असतील. त्यात वृक्षारोपण करण्यात येणार असून स्थलांतरित पक्षी आणि इतर प्राणी अधिवास करू शकतील. हे हिरवे आच्छादन कारखान्यांना लपवेल.

शिवाय रस्त्याच्या कडेला येणाऱ्या प्रवाशांना झाडांची सावली मिळेल आणि वाहनांमधून उत्सर्जित होणारा कार्बन झाडांमुळे शोषला जाईल.

Verna
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

प्रकल्पात चालण्याची पायवाट, ओढा, तलाव असेल. जिथे लोक मुक्तपणे फिरू शकतील आणि प्रासंगिक बैठका आयोजित करू शकतील.

गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत (आयडीसी.) एका सल्लागाराची नियुक्ती करण्‍यात आली आहे, ज्‍याने अरुणाचल प्रदेशमध्ये असा प्रकल्प उभारला आहे. यासंदर्भात सल्लागारांसोबत आमच्या काही बैठका झाल्या, असे दामोदर कोचकर म्‍हणाले.

Verna
Traffic Jam: एकीकडे रस्त्याचे काम दुसरीकडे कंटेनरवर कोसळले झाड, काणकोण-मडगाव मार्गावर वाहतूक कोंडी

सदर प्रकल्पासाठी एकूण 8 एकर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून 15 ते 16 कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे.

या प्रकल्पामुळे वेर्णा पठार भागातील पाण्याची पातळी पूर्ववत होण्यास आणि वाढण्यास मदत होईल. तसेच लोकांना, प्रवाशांना गारव्याचा सुखद अनुभव घेता येईल.

दामोदर कोचकर, गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com