प्रेयसीच्या खुनासंबंधी वेर्णा पोलिसांनी आरोपी प्रियकराला ठोकल्या बेड्या

Goa Murder Case : काल बुधवारी 18 मे रोजी दुपारी आरोपीने पीडित मुलीला वेळसाव बीचवर नेले आणि चाकूने वार करून तिची हत्या केली.
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak

Goa Murder Case : गोव्यातील गुन्हेगारी विश्वातील वाढत्या प्रकरणांमुळे गोवेकरांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र गोवा पोलीस या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतर्क आहेत. वेर्णा पोलिसांनी आज गुरुवारी एका खुनाचा छडा लावला आहे.

वेळसाव येथे एका मुलीचा खून केल्याच्या आरोपाखाली नवे वाडे येथील गाजी स्टॉपजवळ राहणाऱ्या कीशन कलंगूटकर (वय 26) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मृत तरुणी दिया नाईक (वय 18) ही आरोपीची मैत्रीण असल्याचे सांगण्यात आले. (Verna police arrested accused boyfriend in for girlfriend murder crime)

Goa Murder Case
मतदारसंघाच्या समस्या विधानसभेत मांडून कर्तव्य बजावणार; संकल्प आमोणकरांचे आश्वासन

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे पीडित मुलीशी प्रेमसंबंध होते आणि तो त्या प्रेम प्रकरणात असमाधानी होता. त्यानुसार त्याने मुलीचा काटा काढण्याचा कट रचला आणि काल बुधवारी 18 मे रोजी दुपारी आरोपीने पीडित मुलीला वेळसाव बीचवर नेले आणि चाकूने वार करून तिची हत्या केली.

तिच्या मानेवर अनेक वेळा वार करून मृतदेह वेळसाव बीचवर झाडीत लपवून ठेवला. मृत मुलगी आणि आरोपी हे दोघेही नवेवाडे वास्को येथे राहणारे असून त्यांच्या प्रेमप्रकरणातून सदर खून झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोपीच्या मित्राकडून तक्रार दाखल

सदर खून आरोपीने काल केला असल्याचे त्याच्या मित्राकडून सांगण्यात आले. आरोपी आपल्या मित्राच्या दुकानावर येऊन बसला. यावेळी तो बेचैन अवस्थेत होता. आपण खून केल्याचे त्याने मित्राला सांगितले. त्याच्या मित्राने आज सकाळी वेर्णा पोलिस स्थानकात जाऊन त्या आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी त्याचा शोध घेतला.

आरोपी आज सकाळी मित्राच्या दुकानावर येऊन बसलेला आढळला. वास्को पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर वेर्णा पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीने गुन्हा कबूल करुन तिला मारून टाकलेली जागा पोलिसांना दाखवली.आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com