Margao Muncipality: मडगावात नव्या क्रांतीची सुरुवात - विजय सरदेसाई

पितृपक्ष संपल्यावर होणार प्रत्यक्ष कामाला प्रारंभ
आमदार विजय सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई Dainik Gomantak

मडगाव: गोव्यातील बरेच उठाव मडगाव शहरात झाले असून आजचा मडगाव पालिकेतील (Margao Muncipality) विजयसुद्धा नव्या क्रांतीची सुरुवात आहे. गोवा फॉरवर्डच्या मडगाव मतदासंघातील राजकीय प्रवेशाची ही नांदी आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Viajy Sardesai) यांनी व्यक्त केले. पितृपक्ष संपल्यावर आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

मडगाव येथील नवीन राजकीय समीकरणात भाजप सदस्यांची संख्या 16 होत असतानाही आज सरदेसाई यांनी पाठिंबा दिलेले घनःश्याम शिरोडकर यांनी भाजपचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांच्यावर 15 विरुद्ध 10 अशा मतांनी विजय मिळविला. यानंतर शिरोडकर यांचे अभिनंदन करताना, देव कुणाबरोबर आहे ते आज सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यापुढे कदाचित मांद्रेप्रमाणे मडगाव येथेही सत्ताधारी भाजप अविश्वास ठराव आणू पाहतील. मात्र, मुख्यमंत्र्यांनी घाणेरडे राजकारण खेळू नये.

आमदार विजय सरदेसाई
Margao Muncipality: 'देव मलाच पावला' ; नवनिर्वाचित नगराध्यक्ष घन:श्‍याम शिरोडकर

नवी पालिका इमारत फातोर्डात उभारा

मडगाव पालिकेची इमारत मोडकळीस आली आहे. तिची दुरुस्ती त्वरित करण्याची गरज आहे, असे सांगून ही इमारत वारसामूल्य असली तरी ती दिव्यांगस्नेही नाही. त्यामुळे नवीन पालिका इमारत फातोर्डा मतदारसंघात उपलब्ध असलेल्या जागेवर उभारावी, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली.

आता ती भावना राहिली नाही

दीड वर्षापूर्वी मडगावकरांनी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी फॉरवर्ड आणि दिगंबर कामत यांच्या युतीला पाठिंबा दिला होता. कामत हे आता भाजपमध्ये गेले. त्यामुळे ती भावना राहिली नाही, अशीही कोपरखळी सरदेसाई यांनी हाणली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com