वायब्रंट मडगाव पॅनलचे उमेदवार जाहीर 

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

मडगाव पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलने आपले उमेदवार आज जाहीर केले. वायब्रट मडगाव पॅनलचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी येथे पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

मडगाव : मडगाव पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलने आपले उमेदवार आज जाहीर केले. वायब्रट मडगाव पॅनलचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी येथे पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी माजी आमदार व भाजपचे राज्य सरचिटणीस दामू नाईक, फातोर्डा मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर, मडगाव मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे, माजी अध्यक्ष सुबोध गोवेकर व चंदन नायक उपस्थित होते. 

वायब्रंट मडगाव पॅनलच्या उमेदवारांमध्ये माजी नगरसेवक सदानंद नाईक, माजी नगरसेविका बबिता नाईक, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शर्मद रायतुरकर, माजी आमदार कृष्णनाथ बी. नाईक यांचे पूत्र सनील नाईक, माजी आमदार व स्वातंत्र्य सैनिक गजानन रायकर यांचे पूत्र पराग रायकर, माजी मंत्री लुईस आलेक्स कार्दोझ यांच्या कन्या विवियाना कार्दोझ, क्रिकेटपटू वासुदेव कुंडईकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांच्या कन्या डाॅ. रोनिता आजगावकर यांचा समावेश आहे. 

गोवा: गोव्यात लसीकरण उत्सवाला जोरदार प्रतिसाद 

वायब्रंट मडगाव पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे 

प्रभाग 1 रेन्झील मास्कारेन्हस, प्रभाग 2  कालिदास नाईक, प्रभाग, प्रभाग 3 झिको फर्नांडिस, प्रभाग 4 पुष्पा विर्डीकर, प्रभाग 5 दीपश्री कुर्डीकर, प्रभाग 6 सदानंद नाईक, प्रभाग 7 मिलाग्रीना गोम्स, प्रभाग 8 कामिल बारेटो, प्रभाग 9 नर्मदा कुंडईकर, प्रभाग 10 वासुदेव कुंडईकर, प्रभाग 11 जया आमोणकर, प्रभाग 12 शर्मद रायतुरकर, प्रभाग 13 डाॅ. सुशांता कुरतरकर, प्रभाग 14 डाॅ. रोनिता आजगावकर, प्रभाग 15 उदय देसाई, प्रभाग 16 अनिशा नाईक, प्रभाग 17 देविका कारापूरकर, प्रभाग 18 पराग रायकर, प्रभाग 19 मंगला हरमलकर, प्रभाग 20 आलिंडा राॅड्रिग्ज, प्रभाग 21 सचिन सातार्डेकर, प्रभाग 22 सुनील नाईक, प्रभाग 23 विवियाना कार्दोझ, प्रभाग 24 पार्वती पराडकर, प्रभाग 25 बबिता नाईक. 

गोवा: येत्या 4 दिवसात गोव्यात पावसाची शक्यता 

संबंधित बातम्या