उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू १० दिवसांच्या दौऱ्यासाठी गोव्यात दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे आज १० दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आगमन झाले. दाबोळी विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आदींनी त्यांचे स्वागत केले.

दाबोळी :  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे आज १० दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आगमन झाले. दाबोळी विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आदींनी त्यांचे स्वागत केले.

\विधानसभा संकुलाच्या मागील बाजूस असलेल्या हिरवळीवर उद्या दुपारी चार वाजता विधिकार दिनाचा यंदाचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी तो सार्वजनिक लोकलेखा समितीच्या सभागृहात होत असे. यंदा गोवा मुक्तीचे हीरकमहोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने पहिल्‍या, दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानसभेतील हयात सदस्यांचा यानिमित्ताने उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती चेन्नई येथून गोव्यात येतील. त्यानंतरचे ९ दिवस त्यांचा गोव्यात राजभवनावर मुक्काम असेल. दुपारी चार ते सायंकाळी सहा वगळता त्यांचे इतर सर्व कार्यक्रम हे खासगी आहेत.

संबंधित बातम्या