उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शनिवारी गोव्यात

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

गोवा विधानसभेच्या शनिवारी होणाऱ्या विधिकार दिनाच्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत.

पणजी: गोवा विधानसभेच्या शनिवारी होणाऱ्या विधिकार दिनाच्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी ही माहिती दिली. 

त्यानी सांगितले उपराष्ट्रपती १० दिवस गोव्यात असतील. शनिवारी विधानसभा संकुलाच्या मागील बाजूच्या हिरवळीवर मोजक्या तिनशे जणांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या विधानसभेच्या हयात सदस्यांना यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता सुरू होणारा हा सोहळा दोन तास चालणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, विधानसभा कामकाज मंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, विधिकार मंचाचे सचिव मोहन आमशेकर सहभागी होतील.

संबंधित बातम्या