कृतार्थ स्वयंसेवी संस्थेतर्फे गणेश पूजनासाठी चित्रफित

Dainik Gomantak
शनिवार, 25 जुलै 2020

म्हार्दोळ येथील कृतार्थ या स्वयंसेवी संस्थेने महामारीच्या जागतिक संकटामुळे यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यावर काही मर्यादा निश्‍चितच येणार असल्याचे नमूद करून आपल्या घरात व्यवस्थितपणे पारंपरिक पूजा करता यावी, यासाठी सर्व पूजेच्या साहित्याची माहिती ऑडिओ व व्हिडिओच्या माध्यमातून गोव्यातील व गोव्याबाहेरील भाविकांना गणेशचतुर्थीच्या पंधरा दिवस अगोदर प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी खडपाबांध फोंडा येथील विश्‍व हिंदू परिषद सभागृहात बुधवारी सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

फोंडा

यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष जयंत मिरिंगकर, सचिव आनंद वाघुर्मेकर, पुरोहित नारायण बोरकर उपस्थित होते.
राजेंद्र देसाई म्हणाले, कृतार्थ म्हार्दोळ ही संस्‍था या गणेशोत्सवासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवणार आहे. गणेशचतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असून गोव्यातील लोकांचा एक आनंदाचा धार्मिक उत्सव यावर्षी आलेली कोरोना संकटाची काळी किनार लवकरच दूर होईल. म्हणूनच समाजाच्या आरोग्याला स्वास्थ्याला बाधा न येऊ देता त्याचप्रमाणे सर्व नियम पाळून आनंदाने गणेश पूजन करण्यासाठी गोव्यात विविध भागात मागील काही वर्षात मार्गदर्शन केले गेले आहे. यंदा गणेशचतुर्थीला गणपतीची पूजा करण्यासाठी येणार नसल्याने संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. गणेश ही देवता निसर्गाचे स्वरूप असून तिला आवडणाऱ्या वस्तू हे सारेच पर्यावरण प्रेमाचे प्रतीक आहे. दुर्वा, लाल फुल, मोदक हे सारे आपण गणपतीला वाहतो म्हणूनच कृतार्थतर्फे याही वर्षी पर्यावरणपूरक सजावट व कृत्रिमरंग न वापरता बनवलेली बाप्पाची मूर्ती तसेच फटाके व इतर दारूसामानाची आतिषबाजी न करणे, उत्साहाच्याभरात बाहेर भटकणे टाळावे, घरातच राहून श्री गणेशाची आराधना कुटुंबियानी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरोहित नारायण बोरकर यांनी गणेशपूजेला लागणाऱ्या पंचोपचारांची माहिती देऊन संस्थेने तयार केलेल्या पूजनाच्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या