Goa-Karnataka 'सागर शक्ती' नौकानयन मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी दाखवला झेंडा

गोवा कर्नाटकातील 100 छात्र मोहिमेत सहभागी, 10 दिवस चालणार मोहीम
Goa-Karnataka 'सागर शक्ती' नौकानयन मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी दाखवला झेंडा
NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiationDainik Gomantak

पणजी: गोवा (Goa) आणि कर्नाटकातील (Karnataka) एनसीसी छात्रांच्या महासागर नौकानयन मोहीम 'सागर शक्ती 2021' (NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiation) ला डोना पावला समुद्रातून सुरुवात झाली. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समुद्रात जाऊन या सेलर ना शुभेच्छा देत झेंडा दाखवला. या मोहिमेत गोवा आणि कर्नाटकातील 100 हून अधिक छात्र सहभागी झाले असून रोज चाळीस किलोमीटरचा समुद्रातील प्रवास ते करणार आहेत. खोल समुद्रात शिडाच्या बोटीचा हा थरार हे पुढील 10 दिवस चालणार आहे.

NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiation
NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiationDainik Gomantak
NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiation
Goa Election 2022: राजकीय पक्षांची तोंडाची बॅटिंग सुरु...

विद्यार्थी दशेत मुलांमध्ये देशभक्ती, देशाच्या प्रति समर्पण, कर्तव्य ,वचनबद्धता , शिस्त आणि नैतिक मूल्यांच्या विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी कार्यरत आहे. याच एनसीसी मधील छात्र सैनिकांना समुद्राचा अनुभव घेता यावा आणि नौकानयनाचा अभ्यास करता यावा या उद्देशाने पश्चिम विभागीय एनसीसी विभागाने 'सागर शक्ती २०२१' ही महासागर नौकानयन मोहीम सुरू केले आहे. याचे उद्घाटन डोना पावला समुद्रामध्ये झाले. मुख्यमंत्र्यांनी या छात्र सैनिकांनी शुभेच्छा दिल्या.

शालेय आणि महाविद्यालयन काळात देशाच्या प्रती समर्पण वाढावे.एनसीसी मोलाचे काम करत आहे .यातीलच छात्र मोठ्या प्रमाणात सैन्य दलात भरती होतात आणि देशसेवा करतात हा अनुभव आहे यासाठी ही मोहीम महत्वाचे असून त्याचा लाभ देशसेवेसाठी नक्कीच होईल असे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. छात्र सैनिकांच्या मानवंदनेनंतर एनसीसी गोवा आणि कर्नाटकचे उपमहासंचालक एअर कमांडर डी.एस. कंवर यांनी मुख्यमंत्र्यांना जहाजाचे स्मृतिचिन्ह दिले. ग्रुप कमांडर कर्नल के व्ही श्रीनिवासन , कमांडीगं ऑफिसर कॅप्टन डिन झेव्हियर मेंडोसा आणि कमांडर रेजी कृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू राहणार आहे.

NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiation
Goa: पुरातन वारसा नष्ट न करता नुतनीकरण करण्याचा मुरगाव पालिकेने घेतला निर्णय
NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiation
NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiationDainik Gomantak

"छात्र सैनिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आशा प्रकारच्या विशेष प्रशिक्षणाची गरज असते. सागर शक्ती ही मोहीम या मुलांना समुदाचा वेगळा अनुभव देणारी ठरेल."

NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiation
NCC's Sagar shakti 21 Ocean sailing expiationDainik Gomantak

एअर कमांडर डी.एस. कंवर उपमहासंचालक एनसीसी

"सागर शक्ती महासागर मोहीम आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. या मोहिमेत प्रत्यक्ष समुद्रात प्रवास करता येणार आहे याशिवाय सेलिंग शिकता येणार आहे त्यामुळे आमच्यासाठी ही मोहीम अविस्मरणीय ठरेल गेली तीन दिवस क्लासरुम अभ्यास झाला आता प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होत आहेत याचा आनंद झाला आहे."

मनीषा डी सुवर्णा - मंगलोर एनसीसी छात्र

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com