विद्या प्रबोधिनीचा ९३ टक्के निकाल

Vidya Prabodhini 93 percent result
Vidya Prabodhini 93 percent result

पर्वरी,

येथील विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयाची बारावीच्या परीक्षेत यंदाही घवघवीत यश संपादन करून ९३.४३ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत ९३.५५ टक्के, विज्ञान शाखेत ८५.४३ टक्के, तर वाणिज्य शाखेत ९६.३ टक्के लागला आहे. कला शाखेत प्रथम उर्विजा महेश नागवेकर (९१.८३) तिला मानसशास्त्र विषयात १०० पैकी १००, मराठी ९८, अर्थशास्त्र ९२ आणि समाजशास्त्र ९७ गुण मिळाले आहेत. तसेच तिला शाळेत पहिला येण्याचा मान मिळाला आहे. आणि द्वितीय अनुष्का राजेश गायतोंडे (९०.१६) वाणिज्य शाखा, तिला अर्थशास्त्र विषयात ९९ गुण मिळाले आहे. तृतीय सायली प्रशांत गोवेकर (८४.३३, कला शाखा) टक्के गुण मिळाले आहे. तिला समाजशास्त्र ९४ गुण, तर मानशास्त्र विषयात ९१ गुण मिळाले आहेत. कला शाखेत ३ विशेष श्रेणीत, १२ प्रथम श्रेणी, १४ व्दितीय श्रेणीत उतीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत ४ विशेष श्रेणी, ११ प्रथम श्रेणी, २० द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत ९ विशेष श्रेणी, ५३ प्रथम श्रेणी, ५४ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. हिंदी विषयात शिवानी भट ९६ गुण, मराठी विषयात दीक्षा तोरस्कर, तेजा चोडणकर आणि पल्लवी बामणे यांना ९२ गुण तर सिया पागी हिला ९० गुण मिळाले आहे.संगणक विज्ञान विषयात आनंद आनेगुंडी याला ९१ गुण मिळाले आहे. सिद्धार्थ फडते, आयशा बानू, लोकी मंडळ, आदित्य भातकांडे, निशा नार्वेकर, आफरीन जुलाय, शिल्पा साटेलकर आरती गावस, शरयू दळवी, दीप्ती जाधव यांना विशेष श्रेणी मिळाली आहे.

 

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com