गोव्यातील विद्या प्रबोधिनी हायस्कूलमध्ये 10 - 12 वीचे विद्यार्थी दाखल

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

राज्यात महामारीच्या संकटामुळे निलंबित करण्यात आलेल्या आठ महिन्यांच्या अंतरानंतर अनेक शाळा दहावी आणि एक्सएलच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा उघडल्या आहे.

पर्वरी: शनिवारी विद्या प्रबोधिनी हायस्कूल पर्वरी येथे दहावी आणि बाराविचे विद्यार्थी दाखल झाले. राज्यात महामारीच्या संकटामुळे निलंबित करण्यात आलेल्या आठ महिन्यांनंतर अनेक शाळा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा उघडल्या आहे.

प्रत्‍येक वर्गात १२ विद्यार्थी मर्यादा 
शिक्षण संचालकांशी ‘गोमन्तक''ने संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, संचालनालयाने २१ ही तारीख दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी ठरविली आहे, त्यात कोणताही बदल नाही. संचालनालयातर्फे आज एका पथकाने शाळांची काय तयारी झाली आहे, याची पाहणी केली आहे. त्यात शाळांनी बैठक व्यवस्था व परिसर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

एका वर्गात १२ विद्यार्थी अशी व्यवस्था असल्याने दोन विद्यार्थ्यांमध्ये भरपूर अंतर राहू शकणार आहे, असे आमोणकर म्हणाले. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी उद्या उपस्थित राहिले तर साधारण ३० हजारांच्यावर विद्यार्थ्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. परंतु काही पालकांनी आम्ही पाल्याला पुढील आठवड्यात पाठवू, असे शाळा व्यवस्थापनाला कळविले आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या