Vijai Sardesai : 'मी नाही तुम्हीच जा'; जनतेचा पैशावर काढलेल्या मौजमजेच्या ट्रिपमध्ये मला रस नाही

शिष्टमंडळातून नाव वगळण्याची सरदेसाईंची मागणी
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

Vijai Sardesai : गोवा सरकारच्या वतीने गुजरात मध्ये सुप्रसाशन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यावर विजय सरदेसाई यांनी सडकून टीका केली आहे. जनतेचा पैशावर काढलेल्या मौजमजेच्या ट्रिपमध्ये मला रस नाही असे म्हणत या अभ्यास दौऱ्याच्या शिष्टमंडळातून माझे नाव वगळावे अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

Vijai Sardesai
Mahadayi Water Dispute: 'म्हादईवर भाष्य करण्यास मी तज्ञ नाही', केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी म्हादईच्या प्रश्नांना दिली बगल

मुख्यमंत्री सावंत व त्यांचे मंत्री शहाजहान राजवटीसारखे गोवा सरकार चालवत आहेत. हे मंत्री गुजरात मध्ये सुप्रसाशन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर जात आहेत ही मोठी हास्यास्पद बाब आहे अशी टिका सरदेसाईंनी सरकारवर केली.

सरदेसाई म्हणाले, सरकारने 9 आमदारांचा 19 ते 21 फेब्रुवारीला अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यात पहिलेच नाव शहाजहानाचे आहे. ज्या मंत्र्याने निविदा न काढता कला अकादमी दुरुस्तीचे काम करून कोट्यवधीचा गैरव्यवहार केला त्यांच्या बरोबर गुजरात मध्ये अभ्यास दौऱ्यावर जायचे.

Vijai Sardesai
Vasco : वास्कोत 'या' भागात 3 दिवस विजेचा पुरवठा असणार बंद; वाचा सविस्तर

19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान गोव्यात कार्निव्हल महोत्सव सुरु असतो यावेळी आम्ही गुजरातमध्ये फिरायचे हे कशासाठी? या दौऱ्यावर जायची माझी ईच्छा नाही. त्यामुळे या मंत्र्यांच्या अभ्यास दौऱ्याच्या यादीतून माझे नाव वगळावे.

म्हादई आणि कोळसा प्रश्नी सरकारने लक्ष देवून ही समस्या सोडवावी. जनतेचा पैशावर काढलेल्या मौजमजेच्या ट्रिपमध्ये मला रस नाही असे सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com