Vijai Sardesai : विरोधकाची भूमिका समर्थपणे निभावण्यास मी तयार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सर्व स्तरावर अपयशी ठरलेले मुख्यमंत्री असल्याने ते विरोधकांना घाबरतात, असा टोलाही सरदेसाई यांनी लगावला आहे.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

Vijai Sardesai : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सर्व स्तरावर अपयशी ठरलेले मुख्यमंत्री असल्याने ते विरोधकांना घाबरतात. त्याचमुळे त्यांनी काँग्रेस पक्षात होलसेल फूट घालून विधानसभेत विरोधी पक्षनेताच राहणार नाही याची तजवीज केली आहे. असे जरी असले मी जोपर्यंत विधानसभेत असेल तोपर्यंत विरोधकांची भूमिका समर्थपणे पार पाडू, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेता नसतानाही ही भूमिका कशी निभावता येणे शक्य आहे हे मी मागच्या अधिवेशनात दाखवून दिले आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने घाबरू नये, त्यांचा आवाज प्रखरपणे विधानसभेत मी मांडणार याची खात्री त्यांनी बाळगावी, अशी प्रतिक्रिया विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

या पक्षांतरावर त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळी ते म्हणाले, हे एक दिवस असे होणार याची सर्वानाच अपेक्षा होती. कारण ज्या दिवशी मुख्यमंत्री सावंत यांचा शपथविधी झाला त्या दिवसापसूनच काँग्रेस आमदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते.

Vijai Sardesai
Congress MLA Joined BJP : गोव्यात काँग्रेसचे आठ आमदार 'भाजपवासी'

मात्र काँग्रेसच्या या आमदारांनी लोकांच्या लोकशाहीवरील भावार्थाला तडा दिला आहे. याच आमदारांनी आपण काँग्रेस पक्षाशी प्रतारणा करणार नाही अशी शपथ सर्व धर्मांच्या देवासमोर घेतली होती याची आठवण सरदेसाईंनी करुन दिली. पितृपक्ष चालू असताना हे आमदार भाजपात गेले आहेत. त्यामुळे त्यांना देवांचाही पाठिंबा नसेल, असे सरदेसाई म्हणाले.

हे आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले आहेत. त्यासाठी त्यांनी पैसेही घेतले आहेत असा आरोप सरदेसाईंनी केली आहे. त्यामुळे सरकारी कामे करून घेण्यासाठी सामान्य लोकांना आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. सरकारात भ्रष्टाचार आणखीनच वाढणार अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com