Vijai Sardesai : गोव्यातील भाजपचं 'डबल इंजिन' बंद पडलंय, विजय सरदेसाईंचा टोला

कर्नाटकची डीपीआर मान्यता केंद्राने मागे घेतली का इतकंच मुख्यमंत्र्यानी सांगावे, सरदेसाईंचं आवाहन
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

म्हादई बद्दल केंद्रीय नेत्यांकडे चांगली चर्चा झाली असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणतात. मात्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यावर कर्नाटक राज्याच्या नवीन डीपीआरला दिलेली मान्यता मागे घेतली का हे स्पष्ट करावे, असे थेट आव्हान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिले आहे.

जर ही मान्यता मागे घेतली नाही तर गोव्यातील भाजप राजकारण्यांचे केंद्रीय नेते काहीच ऐकून घेत नाहीत किंवा या स्थानिक नेत्यांची केंद्रीय नेत्यांना आपले म्हणणे पटवून देण्याची कुवत नाही हे स्पष्ट होते. भाजपच्या या डबल इंजिन सरकारमधले गोव्यातील इंजिन बंद पडले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोला विजय सरदेसाई यांनी लगावला आहे.

Vijai Sardesai
Mahadayi Water Dispute : म्हादईच्या बचावासाठी आता शाळकरी मुलांचाही एल्गार

सध्या जो मुद्दा आहे आणि गोव्यात जे आंदोलन होत आहे तो म्हणजे कर्नाटक राज्याला मिळालेला डीपीआर मागे घेणे हा आहे. दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाला ही मान्यता मागे घेण्यास केंद्राला राजी करण्यास अपयश आले असेल तर हा दौरा म्हणजे या थंडीच्या काळात जनतेच्या पैशांनी केलेली दिल्ली सहल एव्हढेच त्याला म्हणता येईल, असा निशाणाही सरदेसाई यांनी सरकारवर साधला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com