Mhadei : खुर्ची वाचविण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हादईचा गळा घोटला; विजय सरदेसाई यांचा आरोप

म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाबाबत कर्नाटकच्या 'डीपीआरला' केंद्र सरकारची मंजुरी
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

गेल्या बारा वर्षाहून अधिक काळ न्यायालयीन प्रक्रियांमध्ये अडकलेल्या कळसा-भांडुरा नाल्यावरील पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या सुधारित आराखडयाला केंद्रीय जल आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे म्हादईचा गळा घोटण्याच्या प्रक्रियेला बळ मिळणार असून गोव्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. राज्य सरकारने केंद्रापुढे बाजू मांडून या परवानगीला स्थगिती मिळवावी अशी मागणी पर्यावरण तज्ञ्ज्ञांनी केली आहे. गोव्याची मुख्य जीवनवाहिनी अर्थात म्हादई नदी गोव्याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून वाहते. म्हादईचा 78 टक्के भाग गोव्यात येताे. या म्हादईचा प्रवाह वळविण्याचा कर्नाटकने प्रयत्न चालवला आहे.

Vijai Sardesai
Zuari Inauguration Live Updates : गोव्याच्या प्रगतीत भर; 'मनोहारी' स्वप्न सत्यात

दरम्यान, या प्रकरणी विरोधकांनी आता सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. खुर्ची वाचविण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हादईचा गळा घोटला असा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर केला आहे. अशा कणाहीन मुख्यमंत्र्यानी आतातरी आपल्या खुर्चीवरून खाली उतरून गोव्याचे रक्षण कोण करू शकतो त्यांच्या हाती सूत्रे द्यावीत अशी मागणी केली आहे.

हा निर्णय घेण्यासाठी दिल्लीत जी उच्चस्तरीय बैठक झाली त्या बैठकीला मुख्यमंत्री सावंत उपस्थित होते. याच बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि सी. टी. रवी उपस्थीत होते. मिळालेल्या माहतीनुसार, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी तिथे म्हादई बाबत शब्दही काढला नाही. या उलट त्यांचा काँग्रेस मधून भाजपात आलेल्या आमदारांना पदे देण्याचा पक्षश्रेष्ठीकडे आग्रह होता. यावरून त्यांना म्हादईपेक्षा आपली खुर्ची प्यारी हे सिद्ध होत आहे असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Vijai Sardesai
Anjuna : हणजूण येथे गुन्हा शाखेचा छापा; तब्बल 3 लाखांचे चरस जप्त

या कृतीतून मुख्यमंत्री गोवेकरांना ही म्हादई बरोबर सेल्फी काढण्याची शेवटची संधी असे सांगू पाहतात का ? असा उपरोधिक सवाल केला आहे. गोव्याच्या नद्यांचे मरण ओढवून घेणे ही गोवेकरांसाठी तुमच्या सरकारची नव्या वर्षाची भेट का ? असा सवालही त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे कणाहीन असल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे अशी टीका करताना केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या दबावाखाली गोवा सरकारने स्वीकारलेली ही पूर्णतः शरणागती आहे असे सरदेसाई यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. जी म्हादई मुख्यमंत्री सावंत यांना आपल्या मातेसमान होती तिच्याशी केलेली ही प्रतारणा आहे असे त्यांनी म्हटले आहे. आता म्हादईचा बळी दिला पुढे ते कोळसा आणण्याचा मार्गही खुला करणार आहेत. त्यामुळे प्रमोद सावंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यास लायक नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com