झुआरीचा ‘फास्ट ट्रॅक’ विक्री घोळ

विजय सरदेसाईंचा आरोप : घोटाळ्याची व्याप्ती 5 हजार कोटींची
झुआरीचा ‘फास्ट ट्रॅक’ विक्री घोळ
Vijai Sardesai Dainik Gomantak

मडगाव : झुआरी खत कारखान्याचा पारादीप फॉस्फेट्स कंपनीशी झालेला सौदा हा प्रत्यक्षात एक महाघोटाळा असून या घोटाळ्याची व्याप्ती 5 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

हा सौदा म्हणजे गोव्यातील मालमत्ता ‘फास्ट ट्रॅक’ विक्री घोटाळ्याचाच भाग असून त्यामुळेच गोवा सरकार त्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी मंगळवारी ‘गोमन्तक’शी बोलताना केला. येत्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात आपण त्यावर आवाज उठविणार असल्याचेही ते म्हणाले.

1971 मध्ये सांकवाळ कोमुनिदादच्या मालकीची 400 हेक्टर जमीन झुआरी कारखान्यासाठी 20 पैसे चौ. मी. या दराने विकली होती. आज तीच जमीन रूपांतरित करून 10 हजार रुपये चौ. मी. दराने विकली जात आहे.

Vijai Sardesai
‘सिंडिकेट’ घोटाळा 500 कोटींचा!

झुवारीचे नो कॉमेंट्स

झुवारी व्यवस्थापनाची बाजू जाणून घेण्यासाठी या कंपनीचे कार्यकारी संचालक नितीन कंटक यांच्याशी संपर्क साधला असता, माफ करा मी तुम्हाला कसलीही माहिती देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

राणेंवर दबाव?

तत्कालीन उद्योगमंत्री विश्वजीत राणे यांनी तसे झाल्यास सरकारने झुआरीला दिलेली हजार एकर जमीन पुन्हा ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली होती. आता राणे यांच्याकडे झुवारीबाबत केलेला झोन बदल रद्द करावा, अशी मागणी सरदेसाईंनी केली आहे. मात्र हा निर्णय होऊ नये, यासाठी राणेंवर दबाव येत आहे, असा दावा सरदेसाईनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com