गोव्यात सत्ता कुणाची हे 19 डिसेंबरला स्पष्ट!

विजय सरदेसाई; पर्यावरणप्रेमी विकास भगत यांचा गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश.
गोव्यात सत्ता कुणाची हे 19 डिसेंबरला स्पष्ट!
Vijai SardesaiDainik Gomantak

सासष्टी :(Salcete) गोव्याला मुक्ती मिळून आज 60 वर्षे पूर्ण झाली, पण सत्ताधारी भाजप सरकारने गोव्यात पुन्हा वसाहतवाद निर्माण केला आहे. गोमंतकीयांना या वसाहतवादापासून मुक्ती मिळून गोव्यात आगामी सरकार कुणाचे असणार हे गोवा फॉरवर्ड पक्ष 19 डिसेंबर रोजी जाहीर करणार, अशी घोषणा गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी केली. तर सावंतवाडी सरकारला सत्तेपासून दूर ठेऊन गोमंतकवादी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काणकोण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता तसेच पर्यावरणप्रेमी (Environmentalist) विकास भगत (Vikas Bhagat) यांनी आज गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी (Journalist) बोलताना त्यांनी ही घोषणा केली. गोव्याचा सांभाळ करण्यासाठी भाजप सरकारद्वारे हाती घेण्यात आलेल्या जनविरोधी प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांविरुध्द भाजपने अनेक गुन्हे दाखल केलेले असून गोवा फॉरवर्ड पक्ष सत्तेत आल्यावर या पर्यावरणप्रेमीविरुध्द दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. वेळ्ळीप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेणार असल्याचे आश्वासन आपण दिले होते, तर भाजप पक्षानेच दाखल केलेला हा गुन्हा आपण भाजपमध्ये राहुनच मागे घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Vijai Sardesai
‘जनमन उत्सवा’ला वास्कोत प्रतिसाद!

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या (Goa Forward Party) सरकारात कोळसा येणार नाही याची जबाबदारी पक्ष निश्चितच घेणार आहे. गोव्यात कुठल्याही प्रकारचे प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखान्यांना प्रवेश देण्यात येणार नसून जे काही गोमंतकीयांचे कारखाने कोळशावर चालत आहेत, त्याच्यासाठी आवश्यक असा काही प्रमाणात कोळसा आयात करण्यात येणार आहे, असे विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे विदेशात जाऊन भारतात कोळसा राहणार नाही, अशा घोषणा देत आहेत. दुसरीकडे गोव्यात भाजप सरकार गोव्याला कोळशाचा कॉरिडोर बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

‘शॅकमालकांवरील सक्ती अन्यायकारक’

एमपीटीच्या अख्यत्यारित येणाऱ्या शॅकमालकांना शॅक उभारण्यासाठी ना हरकत दाखल घेण्याची सक्ती घातलेली असून ही सक्ती अन्यायकारक आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरकार सत्तेत आल्यावर एमपीटीकडून ना हरकत दाखला घेण्याची प्रक्रिया बंद पाडणार, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com