"विजय सरदेसाईंनी फोतोर्ड्याला दक्षिण गोव्याचं सांस्कृतिक केंद्र बनवलं"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

मडगाव नगरपरिषदेच्या माजी सभापती पूजा नाईक यांनी “फातोर्ड्याला विकास निधी, सण-उत्सव, पर्यावरण रक्षणाची गरज नसून नोकऱ्यांची गरज आहे”, या माजी आमदार दामू नाईक यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

मडगाव : मडगाव नगरपरिषदेच्या माजी सभापती पूजा नाईक यांनी “फातोर्ड्याला विकास निधी, सण-उत्सव, पर्यावरण रक्षणाची गरज नसून नोकऱ्यांची गरज आहे”, या माजी आमदार दामू नाईक यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. पूजा नाईक म्हणाल्या, "आम्ही दामू नाईकांना आठवण करून देऊ इच्छितो की आमचे नेते आणि फातोर्ड्याचे आमदार विजयी सरदेसाई यांनी फातोर्डेकरांना विश्वासात घेऊन, त्यांच्या संमतीने विकास केला आणि जनतेविरूद्ध पोलिस दलाचा कधीही वापर केला नाही."

गोवा फॉरवर्ड पक्षाची नव्या चेहऱ्यांना पसंती

आमचे आमदार सरदेसाई यांनी फोतोर्ड्याला दक्षिण गोव्याचे सांस्कृतिक केंद्र बनविले आहे. ओपिनियन पोल स्क्वेअर हे कार्निवल, शिग्मो आणि ज्युलससाठी निश्चित मार्ग आहेत, असे माजी सभापती नाईक म्हणाल्या. माझ्यासारख्या भंडारी समाजासारख्या आर्थिकरित्या मागास असलेल्या मुलीला एमएमसीची अध्यक्ष बनवूनपार्श्वभूमी बनवून इतिहास घडविला, जे मी आयुष्यात कधीच बनू शकले नसते, असेदेखील पूजा नाईक यांनी सांगितले.

पणजी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

माजी कौन्सिलर ग्लेन अँड्राडे म्हणाले, “सरदेसाई यांनी हेरिटेज फेस्टिवल माझ्या वॉर्डमध्ये आणले. आपल्या वास्तूंचा वारसा आणि सांस्कृतिक भावनांचा आदर विकास करण्याचा प्रयत्न केला. गोव्याला कोळशापासून वाचविण्यासाठी विजय सरदेसाई खऱ्या अर्थाने गोमंतकीयांबरोबर उभे राहिले, याचा आम्हाला अभिमान असल्याचं ग्लेन म्हणाले.

 

 

 

संबंधित बातम्या