Vaccination: गोमंतकीयांना दोन्ही लस दिल्‍यानंतरच विधानसभा निवडणूक घ्या : सरदेसाई

Vaccination: गोमंतकीयांना दोन्ही लस दिल्‍यानंतरच विधानसभा निवडणूक घ्या : सरदेसाई
vijay sardesai goa.jpg

सासष्टी: 2022 मध्ये गोव्यासह (Goa) अन्य चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मतदारांना शंभर टक्के सुरक्षा देण्यासाठी या पाचही राज्यातील नागरिकांच्या लसीकरणास (Vaccination) प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. गोमंतकीय नागरिकांनी (Citizens of Goa) दोन्हीही लस घेतल्यावर विधानसभा निवडणूक घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती फातोर्डाचे आमदार तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी दिली. (Vijay Sardesai said First vaccinate the citizens of Goa and then hold assembly elections )

फातोर्डा मतदारसंघातील शेतकऱ्यांना आज ‘व्ही फॉर फातोर्डा’मार्फत मोफत भातशेती बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन परेरा, नगरसेवक पूजा नाईक, राजू नाईक व अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. राज्यात कोरोनापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पण, त्यास नागरिकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. आता 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्‍याने नागरिकांना लसी घेण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. 
Covid19 Goa: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा जास्त

संचारबंदी वाढविली, तरीही मृत्‍यूसंख्‍या घटली नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. पण, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कार्यक्रम व कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी झालेले नाही. राज्यात सध्या कोरोनाबधितांची चाचणी कमी होत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी आढळून येत असून राज्यात कोरोनामुळे होणारी मृत्यूसंख्या शून्यावर पोहोचणे आवश्यक आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com