गोवा: एनडीएचा राजीनामा देऊन विजय सरदेसाई यांनी प्रामाणिकपणा दाखवला 

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस पक्षाने मडगाव पालिका निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या सिव्हिल अलायन्स पॅनलला समविचारी नागरिकांचा पाठिंबा हवा असल्यास गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एनडीएमधून राजीनामा देण्याचे आव्हान केले होते.

सासष्टी :  गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस पक्षाने मडगाव पालिका निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या सिव्हिल अलायन्स पॅनलला समविचारी नागरिकांचा पाठिंबा हवा असल्यास गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एनडीएमधून राजीनामा देण्याचे आव्हान केले होते. हे आव्हान सरदेसाई यांनी स्वीकारत एनडीएतून त्वरित माघार घेऊन आपला प्रामाणिकपणा आणि सहनशीलता सिद्ध केली आहे, असे गोंयकार एक पाऊल एकचारा संघटनेचे विकास भगत यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले व त्यांचे अभिनंदनही केले.  (Vijay Sardesai showed sincerity by resigning from NDA) 

गोव्यातील 58 हजार 746 दात्यांना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आवाहन

गोवा संपविण्याच्या इराद्याने गोवा सरकारने नद्यांचे राष्ट्रीयीकरण, कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल्वे रुळाचे दुपदरीकरण, तमनार तसेच अन्य जनविरोधी प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. सरकारच्या या जनविरोधी भूमिकेविरुद्ध विजय सरदेसाई यांनी सतत आवाज उठविला असून सदैव सरकारला धारेवर धरले आहे. गोव्याची सरकरद्वारे होणारी लूट थांबविण्यासाठी गोमंतकीयांना जागृत करण्याचा प्रयत्न केला, असे विकास भगत यांनी सांगितले. 

साखळी: नगराध्यक्षांनी ऑफिसला ठोकलं टाळं; नगरपालिकेत हाय होल्टेज ड्रामा

विजय सरदेसाई यांनी जनविरोधी प्रकल्पाविरोधात सतत आवाज उठवून नागरिकांना सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी प्रवृत्त केले आहे. शिवाय त्यांनी वेळोवेळी गोव्यात आपले सरकार आल्यास राज्यातील गोवा संपविण्यास कारणीभूत ठरणारे हे सर्व प्रकल्प बंद पाडणार असा विश्वासही दिला आहे. यामुळे संघटनेने विजय सरदेसाई आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी युतीने तयार केलेल्या सिव्हिल अलायन्स पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे, असे विकास भगत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या