जुने गोवे चर्चजवळचे वारसा स्थळ जपण्यासाठी विजय सरदेसाईंचे युनेस्कोला पत्र

Vijay Sardesai writes a letter to UNESCO for preservation of heritage sites near Old Goa Church
Vijay Sardesai writes a letter to UNESCO for preservation of heritage sites near Old Goa Church

पणजी : नगरनियोजन मंडळाने ग्रेटर पणजी पीडीएची कक्षा खोर्ली गावाच्या सीमेपर्यंत वाढविल्यास जुने गोवे चर्चजवळचा वारसास्थळाचा परिसर धोक्यात येणार आहे. जुने गोवेचा हा परिसर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला असून गोव्याचा इतिहास व वारसा स्थळाचा सांभाळ करण्यासाठी युनेस्कोचे संचालक आणि आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ परिषदेच्या (आयकॉमोस) उपाध्यक्षांना पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.


नगरनियोजन मंडळाच्या २० नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत ग्रेटर पणजी पीडीएची कार्यकक्षा खोर्ली गावाच्या सीमेपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. ही कार्यकक्षा वाढविल्यास जुने गोवे येथील प्रसिद्ध सेंट केथेड्रल या जागतिक वारसा स्थळापासून अवघ्या १०० मीटरवर ३० मीटरपर्यंतच्या लांबीचे बहुमजली प्रकल्प उभे राहणार व हे जागतिक स्थळ परिसर धोक्यात येणार असे आपण स्पष्ट केले होते, पण यावर सरकार, मंत्री आणि ग्रेटर पणजी पीडीएकडून काहीही प्रतिक्रिया मिळाली नसून यावर सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला. 


जुने गोवेतील या परिसराला ऐतिहासिक महत्व असल्याने युनेस्कोने १९८६ साली या परिसराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते, पण आज हे जागतिक स्थळ धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्याची वारसा स्थळे पुढील पिढीसाठी राखून ठेवण्यासाठी सरकारने ३ डिसेंबरपर्यंत हा प्रस्ताव मागे घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करणे आवश्यक आहे, पण सरकारकडून  योग्य प्रतिक्रिया मिळत नसल्याने आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समुदायाला गोव्याचा इतिहास जपण्यासाठी विनंती केली आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com