खासगी रुग्णालयातील शुल्कात कपात;  विकास गौणेकर यांचा निर्णय 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

राज्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना रुग्णालयात  उपचारासाठी खाटा उपलब्ध करणे आरोग्य खात्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

पणजी :  राज्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना रुग्णालयात  उपचारासाठी खाटा उपलब्ध करणे आरोग्य खात्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे सरकारने ज्या रुग्णांना खासगी रुग्णालयात  उपचारासाठी जाणे शक्य आहे त्यांना खासगी रुग्णालयातील शुल्कात कपात करून नवे दर निश्‍चित केले आहेत. त्याचा आदेश आज आरोग्य अतिरिक्त सचिव विकास गौणेकर यांनी काढला. हा आदेश येत्या ३० एप्रिलपर्यंत लागू असून तो पूर्वी तसेच नव्याने खासगी इस्पितळात दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांसाठी लागू असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Vikas Gaunekar has decided to reduce the fees of private hospitals) 

गोवेकरांनो रात्री बाहेर पडताय? थांबा, आधी हे' वाचा, नाहीतर.. 

सरकारने खासगी रुग्णालयात  कोविड उपचारांचे दर निश्‍चित केले आहेत. सामान्य वॉर्डमध्ये कोविड उपचारासाठी प्रतिदिन ८ हजार रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. एका रुममध्ये दोन रुग्णांसाठी १० हजार ४०० रुपये तर खासगी रुमचा दर १२ हजार ८०० रुपये आहे. आयसीयूमध्ये व्हेंटीलेटरसह उपचार दर १९ हजार २०० प्रतिदिन एवढा ठेवण्यात आला आहे. पूर्वीचे दर आणि आता नव्याने निश्‍चित केलेल्या शुल्कामध्ये सरासरी २ हजार ते पाच हजार ८०० हजार रुपये फरक आहे. 

Goa municipal elections 2021: विश्वासा विरुद्ध खोटारडेपणाची लढत: दामू नाईक

या नव्या शुल्कामध्ये प्राथमिक व स्पेशालिस्ट सल्लागार शुल्क, खाटाचे शुल्क, एक्स रे, ईसीजी, यकृत संसर्ग चाचणी, डॉक्टर तपासणी शुल्क, आहार, कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, २ डी इको, परिचारिका शुल्क, कार्डियाक मोनिटर, इन्फुझन पंप, रक्त चाचण्या व कोविड प्रतिबंधक औषधे याचा समावेश आहे. या नव्या शुल्कामध्ये आजाराचे निदान, विशेष औषधे, विशेष उपकरणांचा वापर, इतर विशेष प्रक्रिया व शस्त्रक्रिया तसेच आयसीयूमध्ये अतिरिक्त ऑक्सिजनचा याचा समावेश नसून त्यासाठी वेगळे शुल्क रुग्णालयाकडून आकारले जाणार आहे. 

संबंधित बातम्या