शिवोलीची आयोजित ग्रामसभा ऐनवेळी रद्द झाल्याने ग्रांमस्थ आक्रमक!

आधीच सभागृहात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात केलेली असल्याने रविवारी अनुचित प्रकार घडण्यापासून वाचला.
Gram Sabha
Gram SabhaDainik Gomantak

रविवारी सकाळी दहा वाजता बोलविण्यात आलेली मार्ना-शिवोली पंचायतीची ग्रामसभा संबंधित सचीव धीरज गोवेकर गैरहजर राहिल्याने सरपंच शर्मीला वेर्णेकर व पंचायत मंडळाकडून आयोजित ग्रामसभा (Gram Sabha) तहकूब करण्यात आल्याने संतापलेल्या ग्रांमस्थांनी पंचायत मंडळाला बराचवेळ धारेवर धरले व सभागृहात गोंधळ घातला. मात्र, आधीच सभागृहात मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक तैनात केलेली असल्याने रविवारी कोणताही अनुचित प्रकार घडण्यापासून वाचला.

दरम्यान, ग्रामसभेसाठी उपस्थित स्थानिक रिव्हुलिशनरी संघटणेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी येत्या आठवडाभरात पुन्हां ग्रामसभा न बोलविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा गर्भीत इशारा शिवोली पंचायत मंडळाला दिला आहे. दरम्यान, रविवारी बोलविण्यात आलेल्या मार्ना शिवोली ग्रामसभेची जाहिरात आठवडा भरापुर्वीच पंचक्रोशीतील लोकांना दिवसभर चार चाकी वाहन फिरवून लाऊडस्पीकद्वारा देण्यात आली होती. दरम्यान, गावांतील ग्रांमस्थ तसेच स्थानिक रिव्हुलिशनरी संघटणेचे कार्यकर्ते ठरल्या वेळेनुसार रविवारी सकाळी पंचायत सभागृहात सभेसाठी मोठ्या संख्येने जमा झाले असतां पंचायत सचीवांच्या अनुपस्थितीत ग्रामसभा घेण्यास असमर्थ असल्याचे कारण पुढे करीत सरपंच शर्मीला वेर्णेकर यांनी रविवारची ग्रामसभा तहकूब करण्यात येत असल्याची माहिती उपस्थित ग्रांमस्थांना दिली.

Gram Sabha
'या' हट्टापायी काँग्रेस पक्ष फुटला..

यावेळी संतापलेल्या ग्रांमस्थांनी पंचायत मंडळाशी बराचवेळ हुज्जत घालीत सभागृहात गोंधळ घातला. या प्रकरणावरून संतापलेल्या स्थानिक रिव्हुलिशनरी संघटणेचे नेते उध्देशजी पांगम तसेच इतरांनी येत्या आठवडाभरात मार्ना- शिवोली पंचायतीची ग्रामसभा सरपंच शर्मीला वेर्णेकर यांच्याकडून पुन्हां बोलविण्यात न आल्यास विद्यमान पंचायत मंडळाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा गर्भीत इशारा दै. गोमंतकशी बोलतांना दिला.

प्रतिक्रिया : अम्रुत आगरवाडेकर (अध्यक्ष शिवोली नागरिक समीती) गांवचा विकास आणी प्रगती व्हावी या शुद्ध हेतूने पंचायत मंडळाला लोकांनी निवडून दिलेले असते आणी वेळोवेळी संपन्न होणाऱ्या ग्रामसभांत मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रांमस्थ पंचायत मंडळाला याबाबतीत सुचना करण्याबरोबरच त्यांच्याकडून झालेल्या चुकांबद्दल त्यांना सावध करत असतात. आठवड्यापुर्वी घोषित करण्यात आल्यानुसार आज आंम्ही ग्रामसभेला उपस्थित राहाण्यासाठी आलो होतो परंतु शेवटच्या क्षणी कुठलीही सुचना न देतां ग्रामसभा तहकूब करुन पंचायत मंडळाने ग्रामसभा कायद्याबरोबरच ग्रांमस्थांचाही जाहीर अपमान केला आहे.

शर्मीला वेर्णेकर (सरपंच-मार्ना-शिवोली पंचायत) पंचायतीचे सचीव धीरज गोवेकर ऐनवेळी सुट्टीवर गेल्याने रविवारी सकाळी सडये पंचायत सचिवांच्या अध्यक्षतेखाली (वरिष्ठांच्या आदेशानुसार) ग्रामसभा घेण्याचे पंचायत मंडळाकडून ठरविण्यात आले होते. परंतु त्यांनीही ऐनवेळी आपण रजेवर जात असल्याची कल्पना दिल्याने रविवारची सभा नाईलाजाने तहकूब करावी लागली. ग्रांमस्थांना झालेल्या गैरसोयीची दखल घेत पंचायत मंडळ लवकरच पुन्हां सभेचे आयोजन करण्यासाठी बैठक बोलविणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com