गोवा सरकारने IIT प्रकल्प होणारच असा घेतला पवित्रा...पण!

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

येथील आयआयटी प्रकल्पाला तेथील स्थानिकांनी गेल्या काही महिन्यापासून विरोध सुरूच ठेवला आहे. सरकारने हा प्रकल्प होणारच असा पवित्रा घेतला आहे.

शेळ -मेळावली: येथील आयआयटी प्रकल्पाला तेथील स्थानिकांनी गेल्या काही महिन्यापासून विरोध सुरूच ठेवला आहे. सरकारने हा प्रकल्प होणारच असा पवित्रा घेतला आहे.

आज या प्रकल्पाच्‍या जागेचे सीमांकन करण्यासाठी अधिकारी येणार असल्याने काल रात्रीच तेथील काही आंदोलनकर्त्यांनी व्हिडिओ वायरल करून राज्यातील लोकांना या विरोधाला पाठिंबा देण्यासाठी तेथे यावे अशी विनंती केली होती. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून विरोध होणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तेथील आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून रस्ता अडविला होता.

आणखी वाचा:

गोव्यातील ऊस उत्पादकांचे आंदोलन तीव्र -

संबंधित बातम्या