सत्तरीतील आयआयटी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध कायम

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

सत्तरी तालुक्यातील शेळ  मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध कायम आहे.

वाळपई : सत्तरी तालुक्यातील शेळ  मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. प्रकल्पाच्या जमिनीचे सर्वेक्षण केले जाणार म्हणून ग्रामस्थांनी त्या जागेकडे जाणारा रस्ता अडवला आहे. 

होंडा येथील पोलिस चौकी आणि वाळपई पोलिस ठाण्यात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने आपल्याला अटक केली जाईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. काल त्यांनी राज्यातील इतर जनतेने लढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन करणारी चित्रफित जारी केली होती. 

आंदोलकांनी भगवे झेंडे फडकावले असून क्रांतीची निशाणी असणारी मशाल पेटवली आहे. परिसरातील तीन  बारही आंदोलकांनी बंद केले आहेत. शेळ मेळावलीत आता तणावाचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या