आसगाव-शापोरात पाणीटंचाई

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती करून देतानाच लवकरात लवकर पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आ

शिवोली : बार्देशातील शापोरा परिसरात गेलेदहा दिवस पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने बुधवारी दुपारी या भागातील ग्रामस्थांनी म्हापशातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात धडक 
मारली. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती करून देतानाच लवकरात लवकर पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. 

संबंधित खात्याचे अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाकडून शापोरातील ग्रामस्थांना सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक पंचायत कार्यालयाकडून या भागातील जुनाट जलवाहिनी बदलून त्याजागी नवीन जलवाहिनी घालण्‍यासाठी स्थानिक पंचायतच्या मासिक बैठकीत मंजूर झालेला ठराव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात येताच हा प्रश्न धसास लावण्याचे आश्वासन अधिकार्यांनी ग्रामस्थांना दिले. 

दरम्यान, अनियमित पाण्याचा प्रश्न नजीकच्या आसगाव पंचक्रोशीलाही सतावत असल्याने सध्या ग्रामस्थांना खासगी टँकरचे पाणी विकत घेण्‍याची वेळ आली आहे. संबंधित खात्याकडून ग्रामस्थांची पाण्याअभावी होणारी गैरसोय लवकरात लवकर सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

संबंधित बातम्या