मोप विमानतळासाठी जमीन देण्यास जोरदार विरोध; ग्रामस्थ ताब्यात

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

पेडणे तालुक्यातील मोप येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय हरित विमानतळास राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी करावयाच्या रस्त्यासाठी भू सर्वेक्षणाच्या कामाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे.

पणजी: पेडणे तालुक्यातील मोप येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय हरित विमानतळास राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी करावयाच्या रस्त्यासाठी भू सर्वेक्षणाच्या कामाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. दाडाचीवाडी धारगळ येथे या प्रस्तावित रस्ता सर्वेक्षणासाठी सरकारी कर्मचारी आज सकाळी आले होते. त्यांना कोणतेही काम ग्रामस्थांनी करू दिले नाही. यापूर्वी संपादित करण्यात आलेल्या जमिनीतून  रस्ता करावा नव्याने त्यासाठी भूसंपादन करू नये अशी ग्रामस्थांची मागणी आहे. विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना ताब्यात घेणे पोलिसांनी सुरू केले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा दाडाचीवाडी धारगळ येथे तैनात करण्यात आलेला आहे. 

गोव्यातील गुंडांना येत्या सहा महिन्यात तडिपार करणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय 

पेडणे विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर करतात. त्यांनी गेल्या पंधरा दिवसात या ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. या ग्रामस्थांनी पैकी काही जणांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी यावे असे त्यांचे प्रयत्न होते, मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत. मोप विमानतळ प्रकल्पासाठी एक कोटी चौरस मीटर जमीन सरकारने याआधीच आमच्याकडून घेतली आहे, रस्त्यासाठी ही आम्ही जमीन दिली आहे, आता उर्वरित शेतीही सरकारने ताब्यात घेऊ नये. आम्हाला भूमिहीन करू नये, अशी या ग्रामस्थांची मागणी आहे. धारगळ परिसरात याआधी क्रिकेट स्टेडियम, आयुष मंत्रालया चे इस्पितळ, क्रीडानगरी आदी प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. यामुळे आम्हाला जमीन शिल्लक राहणार नाही अशी ग्रामस्थांची भावना झालेली आहे.

गोवा सरकारसमोर बैलांच्या झुंजी थांबविण्याचे मोठे आव्हान 

संबंधित बातम्या