कणकवलीतील त्या दोन गावांना लवकरच सरपंच मिळणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंचपदाच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

कणकवली : तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंचपदाच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. तहसील कार्यालयाकडून जिल्हा निवडणूक विभागाला याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे रिक्त जागांवर सरपंचपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आशिय आणि ओझरम ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंचपदासाठी ही प्रक्रीया लवकरच होणार आहे.

तालुक्‍यातील अशिय आणि ओझरम ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने या दोन्ही जागा सध्या रिक्त आहेत. सरपंच म्हणून थेट निवडून आलेले ओझरमचे सरपंच प्रदीप राणे तसेच आशिये ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्‍मी बाणे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. या दोन्ही ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये थेट सरपंच पदाच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या; मात्र पक्षांतर्गत वादातून दोन्ही सरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या दोन्ही ग्रामपंचायती सरपंच पद रिक्त आहेत. आशिये सरपंच पद हे ओबीसी महिला राखीव तर ओझरम सरपंच हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. general

गोव्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी

आता या निवडणुका निवडून आलेल्या त्यावेळच्या सदस्यमधून केल्या जाणार आहेत. राज्य शासनाने थेट सरपंच निवडणुका रद्द करून ग्रामपंचायत सदस्यमधून सरपंच निवडीला मान्यता दिली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या याच पद्धतीने पूर्ण करण्यात आल्या. आता नव्याने आरक्षण ही निश्‍चित केले आहे; मात्र ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत, तेथेच आरक्षण लागू होणार आहे. रिक्त असलेल्या जागांवर 2015 ते 2020 पर्यंत लागू असलेले आरक्षणनुसार रिक्त असलेल्या जागांवर सरपंचपदाच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

संबंधित बातम्या