शहरांप्रमाणे गावांचाही विकास व्‍हावा: पी. एस. श्रीधरन पिल्लई

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पत्नी रिता पिल्लई यांच्यासमवेत तिसवाडी तालुक्यातील दिवाडी बेटाला भेट
गोवा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई
गोवा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लईDainik Gomantak

पणजी: ‘संपूर्ण गोवा यात्रा’ उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पत्नी रिता पिल्लई यांच्यासमवेत तिसवाडी तालुक्यातील दिवाडी बेटाला भेट दिली. तेथील श्री गणेश मंदिर व अवर लेडी ऑफ पायटी चर्चला भेट देऊन प्रार्थनाही केली.गोव्याला समृद्ध संस्कृती लाभली आहे. येथील लोक मनाने खूप चांगले आहेत. जेव्हा मी मंदिरे आणि चर्चना भेट देतो, तेव्हा मला विविधतेत एकता आणि परंपरेचे दर्शन घडते. गोव्यात विविध जाती-धर्माचे लोक एकमेकांशी चांगले वागतात, असे राज्यपालांनी सांगितले.

गोवा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई
आमदारांचा विरोध, मात्र भाजपला लोकसभेसाठी हवी आहे मगोपची साथ

‘संपूर्ण गोवा यात्रा’ उपक्रमाचा उद्देश सांगताना ते म्‍हणाले की, लोकांचे वास्तव जीवन गावात दिसते. शहरे विकसित होत आहेत हे चांगले आहे, पण शहरांबरोबरच गावांचाही विकास व्हायला हवा. लोकशाहीत लोक सर्वोच्च आहेत आणि गोव्यातील जनतेची सेवा करण्याचे कर्तव्य पार पाडताना मला खूप आनंद होत आहे. दरम्‍यान, यावेळी राज्यपालांनी दिवाडीच्या लार सांता मार्गारिदा संस्थेस, ओम श्री विनायक देवस्थानास तसेच एका डायलिसीस रूग्णास आर्थिक मदत वितरीत केली.

गोवा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई
Goa Politics: प्रस्‍थापित राजकीय नेत्यांच्या हृदयात भरली मोठी धडकी!

आपल्‍या भेटीत राज्‍यपालांनी गोलती-नावेली आणि मथियास-मळारच्या सरपंच, पंचसदस्यांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली. तसेच ग्रामस्थांना त्यांचे प्रश्न नवीन सरकारकडे मांडण्याचे आश्वासनही दिले. गोव्यातील लोकांच्या भल्यासाठी आपण कठोर परिश्रम करणार असल्याची ग्‍वाही त्‍यांनी दिली. यावेळी नवनिर्वाचित आमदार राजेश फळदेसाई, गोलती-नावेली सरपंच मारियो पिंटो, सां-माथियास सरपंच मोहन वळवईकर, इतर पंच, राज्यपालांचे सचिव मिहिर वर्धन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com