ड्रग्ज माफियांवर जरब बसविण्यासाठी चांगला अधिकारी नेमण्याची गरज - विनोद पालेकर 

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 मार्च 2021

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो तसेच क्राईम ब्रांच यांनी संयुक्तरित्या कारवाई करून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज व्यवसायात असलेल्या माफियांविरुद्ध कारवाई केली आहे.

पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो तसेच क्राईम ब्रांच यांनी संयुक्तरित्या कारवाई करून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज व्यवसायात असलेल्या माफियांविरुद्ध कारवाई केली आहे. स्थानिक पोलिस निरीक्षक सूरज गावस यांना माहीत असूनही कारवाई केली जात नाही त्यामुळे या निरीक्षकाविरुद्ध कारवाई व त्वरित तेथून बदली करावी आणि त्याजागी अनुभवी, धडक कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रामाणिक  निरीक्षकांची नेमणूक केली जावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालेकर यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली. 

''सर्व पालिका आणि महापालिका निवडणूक एकत्र घ्याव्यात''

विनोद पालेकर यांनी ही कारवाई न केल्यास आम्ही कायदा हातात घेऊ असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान येत्या विधानसभेत किनारपट्टी भागात सुरू असलेल्या व्यवसाय प्रकरणी लक्ष्यवेधी सूचना मांडणार असल्याचे आमदार पालकर यांनी पुढे सांगितले.

''सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तमाम गोमंतकीयांची देशभरातच नव्हे...

यापूर्वी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक असलेल्या चंदन चौधरी या धडक कारवाई करत होत्या मात्र सध्याचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट असून हे कारवाई करण्यात खूपच मागे पडत आहेत त्यामुळे ड्रग्ज व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. अनेकदा पोलिसांना माहिती व तक्रारी देऊनही तात्पुरती कारवाई केली जाते. मात्र या कारवाईत सातत्य राहत असल्याने व्यवसायिकांना रान मोकळे झाले आहे अशी टीका आमदार पालेकर यांनी केली.

संबंधित बातम्या