गोव्यात संचारबंदीच्या नियमांचा उडाला फज्जा; हरमल भागात हॉटस्पॉट जाहीर

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

सरकार व आरोग्य खात्याने हरमल व अन्य भाग ''हॉटस्पॉट'' ठरविले असले तरी याबाबत काय उपाययोजना करण्यात येईल,तसेच नियमावली व उपाययोजना कश्याप्रकारे राबविली जाईल, ह्याची माहिती सरकारने दिली नसल्याने नागरिक प्रमेश मयेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

हरमल: कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे गोमंतकीय चिंतेत असल्याने सरकारने एका फतव्याद्वारे नाईट कर्फ्यु लावल्याने समाधान असले तरी गोव्याच्या सीमा खुल्या असून नेमके काय साध्य करण्यासाठी सरकारने कर्फ्यु अंमलबजावणी केली सदरचा प्रकार दुर्दैवी असून सरकारची इस्छाशक्ती दिसून येत नसल्याने नागरिकांत संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

सरकार व आरोग्य खात्याने हरमल व अन्य भाग ''हॉटस्पॉट'' ठरविले असले तरी याबाबत काय उपाययोजना करण्यात येईल, तसेच नियमावली व उपाययोजना कश्याप्रकारे राबविली जाईल, ह्याची माहिती सरकारने दिली नसल्याने नागरिक प्रमेश मयेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

Goa municipal elections 2021: विश्वासा विरुद्ध खोटारडेपणाची लढत: दामू नाईक 

गोव्यापेक्षा महाराष्ट्र व नजीकच्या राज्यांत कोविड रुग्णसंख्या बरीच वाढलेली असून महाराष्ट्रात गोव्यातील प्रवाशांना थर्मल स्कॅनिंग व अन्य सोपस्कार करावे लागतात मात्र  प्रवाशांना गोव्यात खुले आम प्रवेश म्हणजे कोविडला निमात्रणच असल्याची प्रतिक्रिया नागरिक सोमकांत हरमलकर यानी दिली.गोव्यातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राने तितके गंभीर घेणे उचित नव्हते मात्र गोव्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री इतके बेसावध व बेफिकीरपणे राज्यकारभार करीत असल्याचे पाहून किंव येते असे हरमलकर यांनी सांगितले.

‘हॉटस्पॉट’ विषयी भीती

आरोग्यखात्याने किनारपट्टी व विशेषतः हरमल भाग हा ''हॉटस्पॉट'' ठरविल्याने नागरिक व युवकांनी नाराजी व्यक्त केली.जर का हॉट स्पॉट जाहीर केला तर मग कोणती काळजी अद्यपी घेतली ह्याबाबत आरोग्य खात्याने जाहीर करावयास हवे. कालच्या दैनिकांतून वाचनात आल्याने नागरिक बरेच खवळले होते.एखाद्या भागांत सात-आठ जण रुग्ण सापडले त्याअर्थी आरोग्यखात्याने त्या भागात प्रवेश बंदी वा उपाययोजना करण्याची खरी गरज होती असे मत नागरिक श्यामकांत पेडणेकर यांनी व्यक्त केले.तिथल्या वर्दळीवर तसेच नागरिकांच्या ये जा हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पोलिस पहारा वगैरे तैनात करण्याची गरज होती,मात्र तशी व्यवस्था अद्यापही केली नसल्याचे नागरिक पेडणेकर यांनी सांगितले.

गोवेकरांनो रात्री बाहेर पडताय? थांबा, आधी हे वाचा, नाहीतर.. 

किनाऱ्यावर व रस्त्यारस्त्यात मास्कविना नागरिक

कोरोनाची दुसरी लाट उंबरठ्यावर असूनही काही बेफिकीर व उद्दाम पर्यटक व नागरिक मास्कविना मुक्तपणे हिंडत असल्याने नागरिक टोनी डिमेलो यांनी नाराजी व्यक्त केली.गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन वेळी पोलिसांनी चांगली सेवा दिली होती मात्र सध्या ढिसाळपणा व हलगर्जीपणा होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.पोलिसांना हुलकावणी देण्यात पर्यटक तरबेज बनले असून थोड्या वेळासाठी मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी 
हिंडत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला.
 

संबंधित बातम्या