Goa Traffic Rules: वाहतूक नियमांचे उल्लंघन; पोलिसांनी काढले फोटो... 145 जणांना पाठवली चलनाची नोटीस

साध्या वेशात पोलिस तैनात
Goa Traffic Rules
Goa Traffic RulesDainik Gomantak

Goa Traffic Rules: अलिकडे वाहनधारकांकडून सर्रासपणे मोटर वाहन कायदा तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने म्हापसा उपविभागीय पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांनी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत त्यांनी आपल्या पोलिस स्थानकांतील कार्यक्षेत्रात साध्या वेशात पोलिस तैनात केलेत. ज्यांना उल्लंघनकर्त्यांचे फोटो काढण्याचे निर्देश दिलेत.

Goa Traffic Rules
Sankalp Amonkar: अमित पाटकर पैसे देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले; भाजप आमदार संकल्प आमोणकरांचे गंभीर आरोप

या उपक्रमानुसार म्हापसा, हणजूण व कोलवाळ पोलीस कार्यक्षेत्रात मंगळवारी (ता. 21) एकूण 145 उल्लंघनकर्ते आढळले. या उल्लंघनकर्त्यांना वाहतूक पोलीस विभागाकडून चलनाच्या नोटीस पाठविल्या जातील. ज्यामध्ये अनेकांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते.

मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईसाठी गोवा पोलिसांनी ही खास फोटोग्राफी उपक्रम राबविण्यास सुरवात केल्याची माहिती उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.

सध्या रस्ता अपघातबळी वाढत असून अनेकजण हेल्मेट न घालणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, सील बेल्ट न लावणे आदी मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करताहेत. आणि उल्लंघन करताना संबंधित चालक पोलिस कर्मचार्‍यांना गणवेशात पाहताच एकतर ओव्हरस्पीड किंवा चलनपासून वाचण्यासाठी इतर रस्त्याचा अवलंब करीत पळ काढतात, याकडे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी लक्ष वेधले.

Goa Traffic Rules
CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या भेटीला...

दरम्यान, दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केल्याचे असल्यास अनेकदा अपघातवेळी संबंधित चालकाचा जीव वाचतो किंवा डोक्याला गंभीर दुखापत टाळता येते. त्यामुळे बेशिस्त चालकांत वाहतूक शिस्तपणा येण्यासाठीच हा नवीन उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिवबा दळवी यांनी दिली.

उल्लंघनकर्त्यांचे फोटो हे वाहतूक पोलिस विभागाला पुढे पाठविले जातील, आणि संबंधित उल्लंघनकर्त्यांना या कार्यालयाकडून चलनाच्या नोटीस पाठविल्या जाणार असल्याचे दळवी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com