मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसचा निषेध  
Violations of the Code of Conduct by the Chief Minister

मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसचा निषेध  

पणजी : राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असताना पणजी कार्निव्हलचे उद्‍घाटन काल मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी केल्याप्रकरणी गोवा प्रदेश काँग्रेसने निषेध केला आहे. या घटनेची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन ठोस कारवाई करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

आयोगाचे सचिव मेल्विन वाझ यांनीही कालच त्वरित पर्यटन खात्याला पत्र पाठवून सरकारी योजनांच्या जाहिराती तसेच सरकारी यंत्रणा कार्निव्हलमध्ये सहभागी करण्यात येऊ नयेत असे स्पष्ट कळविले होते. तरीही पणजीतून सुरू झालेल्या कार्निव्हल महोत्सवाचे उद्‍घाटन मंत्र्यांनी केले, असे काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

भाजपने भारतातील प्रत्येक घटनात्मक संस्थेची पद्धतशीरपणे हत्या करत त्यांचा विभाजनवादी विषयपत्रिका (एजेंडा) पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपला लोकशाही मूल्यांचा आदर नाही. पर्यटन खात्याचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी पणजी कार्निव्हल मिरवणुकीमध्ये आपल्या मुलाच्या नाईक क्लबला परवानगी देताना इतरांवर मात्र अन्याय केला आहे.

या उपमुख्यमंत्र्यांकडे ‘मिशन कमिशन’ हा एकमेव मुद्दा आहे. त्यांनीयापूर्वी पर्यटनाच्या कार्यक्रमात आपल्या कुटुंबियाला परदेशात सहभागी करून करून सरकारी निधीचा गैरप्रकारे वापर केला होता. राज्यातील सरकार सर्व पायंडावर अपयश झाले आहे त्यामुळे ते कार्यक्रमात सहभागी होऊन प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका पणजीकर यांनी पत्रकार केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com