वास्कोत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अज्ञाताविरोधात तक्रार दाखल

अज्ञाताविरोधात तक्रार दाखल
Violence against a minor girl in Vasco
Violence against a minor girl in VascoDainik Gomantak

वास्को : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी वास्को पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. ही घटना फेब्रुवारी 2022 मध्ये घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वास्को पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, एका अल्पवयीन मुलीवर फेब्रुवारी 2022 मध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मंगळवार दि.10 रात्री पोलीस स्थानकात रीतसर अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Violence against a minor girl in Vasco, a complaint filed against anonymity)

विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात कलम 376 गोवा बाल कायदा (8) व पोस्को खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वास्को पोलीस विनयभंग लैंगिक अत्याचार प्रकरणी अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी वास्को पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वर्षदा देसाई तपास करत आहेत.

Violence against a minor girl in Vasco
दक्षिण गोव्यातील सरकारी महाविद्यालय चर्चेत; चौकशीसाठी समुपदेशकांची नेमणूक

दरम्यान, विदेशी नागरिक असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित योगेश मांद्रेकर या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. म्हापसा न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. ही घटना काही महिन्यांपूर्वी घडली असून, मुलीने हल्लीच तिच्या आईला सांगितल्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्याची आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांनी दिली होती.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई ही विदेशी नागरिक असून तिने एका ओडिशा तरुणाशी विवाह केला होता. पती तिच्यापासून दूर झाला होता. संशयित योगेश मांद्रेकर याची या महिलेशी ओळख झाली होती. त्यामुळे पर्वरी येथे राहत असलेल्या या महिलेच्या घरी येणे - जाणे होते. त्यातूनच अल्पवयीन मुलीचे त्याने लैंगिक शोषण केले. ही घटना नोव्हेंबर 2021 मध्ये घडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com