सांतआंद्रे भागात उत्साहात श्री गणरायाला निरोप

प्रतिनिधी
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

सांतआंद्रे भागात दीड दिवसीय गणेशमूर्तीचे विसर्जन झाले असले तरी गणेशभक्तांचा चतुर्थीचा उत्साह कायम होता. आज (सोमवारी) संध्याकाळी उशिरापर्यंत घरोघरी उत्तर आरत्यांचे व मंगलमूर्ती मोरयाचे सूरही कानी पडत होते. 

गोवा वेल्हा: सांतआंद्रे भागात दीड दिवसीय गणेशमूर्तीचे विसर्जन झाले असले तरी गणेशभक्तांचा चतुर्थीचा उत्साह कायम होता. आज (सोमवारी) संध्याकाळी उशिरापर्यंत घरोघरी उत्तर आरत्यांचे व मंगलमूर्ती मोरयाचे सूरही कानी पडत होते. 

दीड दिवसांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाला २३ रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात आरती व संध्याकाळी उत्तर आरती झाल्या. भक्तांनी ‘कोविड’ संकटाचे भान ठेऊन साधेपणानेच आरत्या केल्या. मास्कचा वापर केला, डिस्टनसिंग पाळले व लोक गर्दीपासून दूर राहिले. गणेशमूर्तीचे विसर्जन नदीच्या पात्रात, तळ्याच्या पाण्यात तर काहींनी समुद्र किनारी केले. या ठिकाणी लोकांनी गर्दी टाळली व पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन केले. या काळात घरोघरी गणेशमूर्तींचे दर्शन घेणाऱ्यांची वर्दळ कमी होती. दारू कामाकडे लोकांनी पाठ फिरविली.

हिंदू बांधवांनी गणेशमूर्तीची स्थापना केल्यानंतर गणेश पूजन, पारंपरिक धार्मिक विधी, आरती व प्रसाद झाला. यजमान यांनी स्वतःच तर काहींनी ऑनलाईनवर गणेशपूजन आदी विधी करून घेतले. सांतआंद्रेतील गोवा वेल्हा, नेवरा, आजोशी, पिलार, कुडका, आगशी, शिरदोन, भाटी, मौळा, डोंगरी, मंडूर आदी भागांत सकाळी गणेशमूर्ती स्थापना व पूजन करण्यात आले. यात पाच व त्याहून अधिक दिवसांच्या गणेशोत्सवाचा समावेश होता.

संबंधित बातम्या