विशाल नाईक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

Vishal Naik joins BJP
Vishal Naik joins BJP

सासष्टी:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला नवदिशा प्राप्त करून दिली असून मोदींनी भारताला विकासाच्या पथावर पोचविले आहे. देशात तसेच राज्यात भाजप सरकारचे लोक कल्याणासाठी करण्यात येणारे काम पाहून मोठ्या संख्येने भारतीय नागरिक भाजपमध्ये प्रवेश करीत असून आज वास्कोतील माजी काँग्रेस गट अध्यक्ष विशाल नाईक आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अशी माहिती गोवा भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. 

मडगाव येथील दक्षिण गोवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात विशाल नाईक व त्याच्या कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती तथा भाजपचे वरिष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर, मंत्री व मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर व दामू नाईक, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, भापजमध्ये प्रवेश केलेले विशाल नाईक व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

देशात तसेच गोव्यात भाजप पक्षाशिवाय दुसरा अन्य कुठलाही जनतेसमोर पर्याय दिसत नसल्यामुळे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करीत असून भाजपने गोव्यात केलेल्या सर्वांगीण विकासाला पाहून विशाल नाईक यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशाल नाईक हे केव्हापासून भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी नव्हे, तर लोक कल्याणासाठी प्रवेश केला आहे, असे सदानंद तानावडे यांनी सांगितले. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अन्य पक्षातील कार्यकर्ते प्रयत्न करीत असून येणाऱ्या काळात राजकीय क्षेत्रात काम करणारे अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मनोहर पर्रीकर यांच्या सरकारात आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला होता, पण काही कारणास्तव त्यावेळी ते शक्य झाले नाही.  अखेर अनेक वर्षांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून या पक्षातील पदाधिकारी अनुभवी आहेत. या अनुभवी पदाधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करण्यास मिळणे हे आपले भाग्य आहे. भाजप प्रवेश करण्याचा निर्णय हा आपल्या कार्यकर्त्यांचा असून वास्कोत भाजपचे हात बळकट करण्यासाठी आपण व आपले कार्यकर्ते प्रयत्न करणार आहोत, असे विशाल नाईक यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला नवा चेहरा प्राप्त करून दिला असून आज मोदींकडे जागतिक नेता म्हणून पाहण्यात येत आहे. भाजप पक्षाची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यांचा बळावर दिवसेंदिवस वाढत चालली असून भाजप लोकांचा विचार करून काम करीत असल्यामुळे भाजप पक्षात कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे, असे राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. लोक कल्याणासाठी काम करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीसाठी भाजप हा चांगला पक्ष असून याचाच विचार करून विशाल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com