"डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न आठ दिवसांत निकाली काढा: समितीने दिला आंदोलनाचा इशारा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय आठ दिवसांत निकाली निघाला नाहीतर पुढील आठवड्यात  बुधवारपासून बेमुदत धरणे आंदोलनचा इशारा डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी आज दिला.

 पणजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय २०१२ पासून प्रलंबित आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय आठ दिवसांत निकाली निघाला नाहीतर पुढील आठवड्यात  बुधवारपासून बेमुदत धरणे आंदोलनचा इशारा डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी आज दिला.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीने आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन पाठविले आहे. त्याविषयी समितीने पत्रकार परिषद घेऊन अनुसूचीत जातीच्या समाजाविषयी असलेल्या मागण्यांची माहिती दिली. याप्रसंगी सखाराम कोरगावकर, आरपीआयचे सतीश कोरगावकर यांच्यासह इतर विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या