
पणजी : जनतेच्या विकास, आशा, आकांक्षा आणि कल्याणासाठी तत्पर राहणार असल्याचे ट्वीटरद्वारे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगत येत्या काळात जनतेच्या सर्व समस्या सोडविल्या जातील, असेही ते म्हणाले.
मंत्री विश्वजीत राणे यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटून विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. गेल्या महिनाभरापासून विश्वजित राणे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला असून, थेट विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करीत त्यांच्या कथित गैरव्यवहाराबाबत मोहीम राबवली आहे. याशिवाय पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या सर्व घटनांमुळे विरोधकांमध्ये चिंतेचा सूर आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर आली असून, सध्या सत्ताधारी गटाला काही मतांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत विरोधकांची मते आपल्याकडे वळवल्यास त्याचा फायदा सत्ताधारी गटाला होऊ शकतो. त्यामुळे या बैठकीत विरोधकांना कोंडीत पकडण्याबाबत विशेष चर्चा झाल्याची माहिती आहे.
राणे यांची मोहीम यशस्वी
विश्वजीत राणे यांनी नगरनियोजन आणि शहरविकास खात्याचा ताबा घेतल्यानंतर या खात्यात अमूलाग्र बदल करण्याचे उद्दीष्ट्य ठेवून गैर व्यवहार असलेले बाह्य विकास आराखडे रद्द केले आहेत. या आराखड्यांची तज्ज्ञ समितीमार्फत तपशीलवार चौकशी सुरू आहे. मंत्री राणे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा राज्याबरोबरच देशातही गवगवा केला जात आहे. केंद्रीय पातळीवरही याची दखल घेतल्याने राणे यांच्यात आणखीच जोश आला आहे. त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्यातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.