विश्वजीत राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांना केलं ब्लॉक

विश्वजीत राणे आणि अमित पाटकर यांच्यात ट्विटरवॉर, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
Vishwajit Rane Blocked Amit Patkar on Twitter
Vishwajit Rane Blocked Amit Patkar on TwitterDainik Gomantak

पणजी : गोव्यात सध्या भाजप-काँग्रेसमध्ये पुन्हा घमासान पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच विश्वजीत राणे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आमनेसामने आले आहेत. चिडलेल्या विश्वजीत राणेंनी चक्क अमित पाटकरांना ट्विटरवर ब्लॉक केल्याचं आता समोर आलं आहे. अमित पाटकरांनी तसं ट्विट करत विश्वजीत राणेंना विचारणा केली आहे.

गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विश्वजीत राणे यांच्यावर नुकतीच ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. सत्तरीची शान वाघेरी डोंगर कुणी विकला ? तेव्हा मंत्री विश्वजीत राणे कुठे होते ? वाघेरीच्या विध्वंसाचं ध्येय कुणाचं होतं ? या प्रश्नांची विश्वजीत राणेंनी उत्तरं द्यावी. सवयीप्रमाणे विश्वजीत राणे घाईत आणि संभ्रमीत असल्याचा निशाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी साधला होता. यावर बोलताना विश्वजीत राणेंनी काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. यावर विश्वजीत राणेंनीही जशास तसं उत्तर दिलं आहे.

Vishwajit Rane Blocked Amit Patkar on Twitter
Vishwajit Rane EXCLUSIVE | गोव्यात कॉंग्रेस पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव : विश्वजीत राणे

दैनिक गोमन्तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत गोव्यातील काँग्रेस नेतृत्त्वावर विश्वजीत राणेंनी थेट निशाणा साधला आहे. गोव्यात कॉंग्रेस पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव आहे. आज आहेत ते उद्या कुठे जाणार हे माहित नाही. जे नेते झाले आहेत त्यांना तीन महिने देखील अजून झालेले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाची मनःस्थिती चांगली नाही, अशा शब्दात विश्वजीत राणेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देखील नवे आहेत त्यांच्यापाशी कोणतीही विचारधारा नाही, असा टोलाही त्यांनी मायकल लोबो यांना लगावला आहे. गोमन्तकला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये विश्वजीत राणे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

(विश्वजीत राणेंची संपूर्ण मुलाखत 4 मे रोजी प्रकाशित होणाऱ्या 'दैनिक गोमन्तक'च्या अंकात वाचता येईल)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com