समद्री कासवांचे संरक्षित क्षेत्र वाढवणार : विश्वजीत राणे

संवर्धनासाठी वन खात्‍याच्‍या जमिनीचा वापर करणार असल्याचीही माहिती
समद्री कासवांचे संरक्षित क्षेत्र वाढवणार : विश्वजीत राणे
Vishwajit Rane Dainik Gomantak

पणजी : उत्तर गोव्‍यातील मोरजी आणि मांद्रे, तर दक्षिण गोव्‍यातील आगोंद आणि गालजीबाग हे किनारे कासव संवर्धन क्षेत्र म्‍हणून ओळखले जातात. जगात दुर्मिळ होत असलेली ऑलिव्‍ह रिडले या जातीची कासवे या किनाऱ्यांवर अंडी घालतात. या अंड्यांचे संवर्धन आणि संरक्षण या ठिकाणी केले जाते, त्यामुळे हे क्षेत्र कासव संवर्धनासाठी संरक्षित करणार असल्याचं वनमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

Vishwajit Rane
'सुभाष वेलिंगकरांवर ओल्ड गोव्यात प्रवेश करण्यासाठी बंदी घाला' 

वनमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, गोव्यातील कासव संवर्धनासाठी अधिक क्षेत्र अधिसूचित केले जातील. देशाच्या सागरी कासवाच्या नकाशावर गोव्याला अव्वल स्थान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्यातील वन विभागाचा भाग उपयोगात आणला जाईल. अलिकडच्या काळात राज्‍यातील संवर्धित किनाऱ्यांवर ऑलिव्‍ह रिडले कासवांचे अंडी घालण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्‍यावर्षी पेक्षा यंदाही या कासवांनी अधिक अंडी घातली आहेत. कासव संवर्धन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनविभाग आवश्‍यक ती पावले उचलेल, असे मंत्री राणे म्हणाले.

Vishwajit Rane
फोंड्यातील कदंब बसस्थानक 'बंद'

ऑलिव्ह रिडले हे सागरी कासव पाच दुर्मिळ सागरी कासवांपैकी एक आहे. राज्‍यातील किनाऱ्यांवर ही कासवे दरवर्षी भेट देतात आणि नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत अंडी घालतात. शास्त्रोक्त व्यवस्थापनामुळे यावर्षी 89 कासवांनी येथे आपले घरटे बांधले. ही संख्या अलिकडच्या वर्षांत सर्वात जास्त आहे. सुमारे 6500 अंड्यांची उबवणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यासाठी घरटी स्थळांची योजना आधीच तयार केली आहे. या योजनेच्या आधारे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या समुद्रकिनाऱ्यांवर वर्दळीस आणि रहदारीस परवानगी असणार नाही. या क्षेत्रात केवळ सागरी संवर्धन उपक्रमांना परवानगी असल्‍याचे मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.

उत्तर गोव्यातील तील मोरजी, मांद्रे तर दक्षिणेतील आंगोद, गालजीबाग हे किनारे समुद्री कासवांसाठी संरक्षित असूनही बऱ्याचवेळा पर्यटक आणि स्‍थानिक लोक येत असतात. याचा त्रास कासवांच्‍या पिलांना होतोच. शिवाय अंडी उबवणी प्रक्रियेवरही विपरित परिणाम होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.