निवडून आलेला पंचसदस्‍य जनतेचा

विश्‍‍वजीत राणे : सत्तरीत बिनविरोध निवडून आलेल्‍या पंचांचे अभिनंदन
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak

वाळपई : निवडून आलेला प्रत्येक पंचसदस्‍य हा जनतेचा असतो. कुणाच्याही बाबतीत आकस न बाळगता बिनविरोध निवडून आलेला पंच सर्वांचा पंच आहे असे समजून प्रत्येकाने आपल्या कार्याला चालना द्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

सत्तरी तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींसाठी एकूण 11 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते बिनविरोध निवडून आलेल्या सर्व पंचसदस्‍यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. यावेळी राणे बोलत होते.

आमदार विश्वजीत राणे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राणे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आपल्या प्रभागांमध्ये असलेल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करावेत असे आवाहन केले. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पंचायत निवडणुकीत कर्तबगार उमेदवारांना संधी देण्‍याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले. समाजामध्ये व पंचायतीमध्ये कलह निर्माण करणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊ नका, जेणेकरून त्याचे विपरित परिणाम गावाच्या विकासावर होऊ शकतात, असेही ते म्‍हणाले.

आमदार दिव्या राणे म्‍हणाल्‍या की, पंचायत ही ग्रामीण भागाच्या विकासाचा महत्त्वाचा पाया आहे. हा पाया मजबूत करायचा असेल तर चांगल्या प्रकारचे उमेदवार निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे. म्‍हणूनच येणाऱ्या पंचायतीच्या निवडणुकीत मतदाराने सद्‌सद्‌विवेकबुद्धीने मतदान करावे व चांगले उमेदवार निवडून आणण्यासाठी सहकार्य करावे.

Vishwajit Rane
‘ग्रेटर पणजी’ अखेर निकालात

बिनविरोध निवडून आलेल्या पंचसदस्‍यांमध्‍ये म्हाऊसचे सोमनाथ काळे, ठाणेच्‍या सरिता गावकर, नीलेश परवार, सुभाष गावडे, भिरोंडाच्‍या मनीषा पिळयेकर, उदयसिंग राणे, पिसुर्लेच्‍या राजश्री जल्मी, सावर्डेचे शिवाजी देसाई, होंडाच्या सुमेधा माडकर, गुळेलीचे नितेश गावडे यांचा समावेश आहे.

निवडून आलेला प्रत्येक पंचसदस्‍य हा जनतेचा असतो. कुणाच्याही बाबतीत आकस न बाळगता बिनविरोध निवडून आलेला पंचसदस्‍य सर्वांचा पंच आहे असे समजून प्रत्येकाने आपल्या कार्याला चालना द्यावी. सर्वांच्‍या सहकार्याने विकास साधणे गरजेचे आहे, असे राणे म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com