काँग्रेस नेत्‍यांचे घफले बाहेर काढणार : विश्‍‍वजीत राणे

नवे नेते पक्षाच्या ध्येयधोरणांविषयी अनभिज्ञ
काँग्रेस नेत्‍यांचे घफले बाहेर काढणार : विश्‍‍वजीत राणे
Vishwajit Rane Exclusive interview with Gomantak TVDainik Gomantak

पणजी : गोव्यातील काँग्रेस नेतृत्वावर नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी थेट निशाणा साधला आहे. गोव्यात कॉंग्रेस पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव आहे. आज आहेत ते उद्या कुठे जाणार, हे माहीत नाही. जे नेते झाले आहेत त्यांना तीन महिने देखील अजून झालेले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाची मनःस्थिती चांगली नाही, अशा शब्दात विश्वजीत राणेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देखील नवे आहेत त्यांच्यापाशी कोणतीही विचारधारा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Vishwajit Rane Exclusive interview with Gomantak TV)

Vishwajit Rane Exclusive interview with Gomantak TV
आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सची अपराजित दौड

‘गोमन्तक टीव्ही’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये विश्वजीत राणे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. राणे यांनी लोबो यांच्यावर केलेल्या कारवाईने राणे आणि कॉंग्रेस नेत्यांमध्ये ट्विटरयुद्ध सुरू झाले आहे. गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विश्वजीत राणे यांच्यावर नुकतीच ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. सत्तरीची शान असलेला वाघेरी डोंगर कुणी विकला? तेव्हा मंत्री राणे कुठे होते? वाघेरीच्या विध्वंसाचं ध्येय कुणाचं होतं? या प्रश्नांची विश्वजीत राणे यांनी उत्तरे द्यावीत. तसेच सवयीप्रमाणे राणे घाईत आणि संभ्रमित असल्याचा निशाणा पाटकर यांनी साधला होता. यावर राणे यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. यावर आज राणे यांनी संपूर्ण कॉंग्रेसवरच टीकास्त्र सोडले. मात्री मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना बाजूला सारून विधिमंडळ नेते बनलेले मायकल लोबो यांना पक्षाची ध्येयधोरणे माहीत नाहीत. केवळ खिशात पैसे आहेत म्हणून पाटकर प्रदेशाध्यक्ष बनले आहेत. सध्या या पक्षात नेतृत्वाचा प्रचंड अभाव असून आहेत त्या नवख्या नेत्यांना पक्षच माहीत नाही. त्यामुळे गोव्यात कॉंग्रेसला भविष्य नाही, असेही ते म्हणाले.

वन्यजीव संवेदनशील परिसर

राज्यात वाघेरीसारखे अनेक परिसर आहेत, जे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर होणे गरजेचे आहे. यासाठी येत्या सहा महिन्यांत केंद्र सरकारच्या मदतीने वाघेरी वन्यजीव संवेदनशील परिसर म्हणून जाहीर करणार असल्याची माहिती वनमंत्री राणे यांनी दिली. वाघेरी हे खासगी जंगल (प्रायव्हेट फॉरेस्ट) आहे. शिवाय हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा बनला आहे. हा परिसर संरक्षित झाल्यास याचा उपयोग काही लोकांच्या स्वार्थासाठी करता येणार नाही. सध्या यातील काही भाग संबंधित मालकाने राज्याबाहेरील लोकांना विकला आहे. मात्र, हे सगळे व्यवहार बेकायदेशीर असून त्यांच्यावर वृक्ष संवर्धन कायदा 1984 आणि नगर नियोजन खात्याच्या कलम 17 ब नुसार ती कारवाई होईलच.

व्याघ्र प्रकल्पाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

राज्यातील म्हादई अभयारण्य आणि अन्य जंगल मिळून व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर होण्यास आपला विरोध असल्याचे सांगत मंत्री राणे म्हणाले, पर्यावरणीयदृष्ट्या वाघ महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच स्थानिक लोकांचे हितसंबंध आणि कल्याण महत्त्वाचे आहे. याकरिता जंगल आणि माणूस यांच्या सहजीवनाला महत्त्व दिले पाहिजे. या परिसराला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची आवश्यकता नाही. सध्या हा परिसर विविध अभयारण्यांनी व्यापलेला आहे. यापुढेही त्याच पद्धतीने त्याचे संवर्धन आणि संरक्षण केले जाईल. व्याघ्र प्रकल्पासाठी मोठ्या बफर आणि कोअर झोनची आवश्यकता असते. गोवा हे अत्यंत लहान राज्य असले तरी 60 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रीन कव्हर असलेले पहिले राज्य आहे, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.