जीएमसी रुग्णांना हलवले सुपर स्पेशालिटी विभागात

मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून गोमेकॉ रुग्णालयाची पाहणी
Vishwajit Rane Inspection of GMC
Vishwajit Rane Inspection of GMCDainik Gomantak

पणजी : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समवेत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या रुग्णालयात होत असलेली रुग्णांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अनेक रुग्णांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. याशिवाय या रुग्णांवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार कशा पद्धतीने केले जातील, यावर ही चर्चा झाली.

Vishwajit Rane Inspection of GMC
बांधकाम नियमितीकरणाचे 90 टक्के अर्ज निर्णयाविना

मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, आपण आरोग्य प्रशासनातील अधिकारी आणि डॉक्टरांच्या समवेत वार्डमध्ये फिरून पाहणी केली. यातील सर्वच वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या अतिरिक्त आहे. यामुळे सध्या या रुग्णालयावर रुगांचा मोठा ताण आहे. तो टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून येथे जे रुग्ण पाठवले जातात.

काही रुग्णांना रात्री गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. याशिवाय सध्या तरी कोणताच पर्याय नाही. यावेळी रुग्णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आरोग्य सचिव राजशेखर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com