युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी : विश्वजीत राणे

पर्येत ‘गरीब कल्याण’ संमेलनाला मोठा प्रतिसाद
युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी : विश्वजीत राणे
Vishwajit Rane Dainik Gomantak

पर्ये : शिक्षित युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. युवकांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, अशी ग्‍वाही नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पर्ये-सत्तरी येथे शनिवारी आयोजित ‘गरीब कल्याण’ संमेलनात ते बोलत होते.

Vishwajit Rane
कोडार येथे आता कृषी महाविद्यालय होणार

यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पर्येच्या आमदार डॉ. दिव्‍या राणे, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, पर्ये सरपंच आत्माराम शेट्ये, डोंगुर्ली-ठाणे सरपंच नीलेश परवार, म्‍हाऊसच्‍या सरपंच वंदना गावस, केरी सरपंच दाऊद सय्यद, मोर्ले सरपंच विद्या सावंत, होंडा सरपंच आत्माराम गावकर, पिसुर्ले सरपंच जयश्री परब , भिरोंडा सरपंच तेरेसा आंद्रेया, सत्तरी भाजप नेते विनोद शिंदे, वाळपई भाजप अध्यक्ष गोविंद कोरगावकर, पर्येचे सर्व पंच सदस्य उपस्थित होते.

Vishwajit Rane
मुळगावची बागवाडा प्राथमिक शाळा धोकादायक स्थितीत

मोदी सरकारच्या काळात देशात अनेक क्रांतिकारी निर्णय झाले आहेत. तसेच या काळात सर्वसामान्य जनतेचा विकास झाला. सर्वसामान्यांसाठी विविध योजना सुरू केल्या असून त्याचा फायदा देशातील गरीब जनता घेत आहे. मोदींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात आणि गोव्यात भाजप सरकार चांगले कार्य करीत आहे, असे राणे म्‍हणाले.

सदानंद शेट तानावडे यांनी मोदी सरकारच्या काळात राबविलेल्या योजनांची माहिती दिली. आमदार दिव्‍या राणे यांनीही मनोगत व्यक्त केले. पर्ये सरपंच आत्मराम शेट यांनी स्‍वागत केले. पाऊस असतानाही या संमेलनाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com